*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मेंढापूर, ता. पंढरपूर या गावात अपूरे लाईट पोल, सतत बंद होणारा विद्युत पुरवठा तसेच भगिरथ योजने संदर्भातील खालील नमूद मागण्या, येत्या एक महिन्यात पूर्ण न केल्यास आम्ही आपल्या विरोधात "बत्ती गुल आंदोलन" करणार असल्या चा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला असून याबाबत सविस्तर माहिती अशी की
मौजे मेंढापूर, ता. पंढरपूर या गावात जवळ जवळ ४० टक्के भागात लाईटचे पोल नाहीत. अनेक चौकात हायमास्ट जोडले नाहीत. अनेक पोलवरती बल्ब /मर्क्युरी जोडले नाहीत. तसेच गावात व आसपासच्या वस्त्यांवर विद्युत पुरवठा सतत बंद होत आहे. अशा प्रकारे गावातील ४० टक्के भाग हा संपूर्ण अंधारात आहे. यामुळे चोऱ्यामाऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे व सरपटणाऱ्या प्राण्यांपासुन मानवी जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.
सतत लाईट बंद होत असल्याने शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी, पाळीव जनावरांना वैरण-पाणी यासंदर्भात मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच सतत लाईट बंद चालु होत असल्याने अनेक गावकरी व शेतकरी यांचे विद्युत उपकरणे, विहीरीवरील मोटार व केबल जळत आहेत.
तरी संपुर्ण गाव व आसपासच्या लोकवस्त्या, शेती विभाग याठिकाणी आवश्यकते नुसार लाईटचे पोल उभे करावेत, जुन्या व नव्या पोलवरती बल्ब-मर्क्युरी जोडावेत. तसेच भगिरथ योजनेतून संपुर्ण गाव व आसपासच्या वस्त्यांवर २४ तास विद्युत पुरवठा करावा व संपूर्ण अंधार नष्ट करून गाव शंभर टक्के उजेडात आणावे.
सदरची आमची मागणी येणाऱ्या एक महिन्यात शंभर टक्के पूर्ण न केल्यास स आम्ही आपल्या विरोधात संविधानिक मार्गाने हलग्यांच्या गजरात आक्रोश करत भव्य स्वरूपात आपल्या कार्यालयासमोर बत्ती गुल आंदोलन करणार आहोत व या आंदोलनात दरम्यान जर काही अनुचित प्रकार घडला किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी जबाबदार आपणच असाल असा इशाराही निवेदनाद्वारे दिला असून मागे जोडलेल्या जुने निवेदनाचे दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे
*. *माहितीस्तव प्रत*
१) मुख्य अभियंतासो मी.रा.वि.वि. विभाग सोलापूर
२) उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर
३) पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस स्टेशन पंढरपूर
४) पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन पंढरपूर
*राहुल शिंदे- पत्रकार*
*वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा