*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
श्रीक्षेत्र तुळजापूरातील श्री तुळजा भवानी मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाचा मंजूर होत असलेला विकास आराखड्याबाबत देविभक्त, स्थानिक पुजारी, व्यापारी व नागरीकांच्या सुचनांचा विचार होत नसल्याबाबत तसेच खालील कुलधर्म कुलाचाराचा विचार करणेबाबत. महाविकास आघाडी व घटक पक्ष तुळजापूर शहर व तालुक्याच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्याबाबत सविस्तर माहिती अशी कि
वरील संदर्भीय विषयो आम्ही महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन करतो की प्रतिवर्षी श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी व कुलधर्म कुलाचार करणा-या देविभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर परिषद यांच्यावरती नियोजनाचा अतिरेक भार पडत आहे.या सर्व बाबींचा विचार करून श्री तुळजा भवानी मंदिर व परिसराचा विकास व्हावा यासाठी नुकतेच राज्याच्या उच्चस्तरीय समितीने होवू घातलेल्या विकास आराखड्याला मंजूरी देवून लवकरच मुख्यमंत्री व राज्यपाल महोदयाकडून मंजुरी घेतली जाणार आहे. श्री तुळजा भवानी मंदीर हे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपिठांपैकी एक मुख्य शक्तीपीठ असून, आध्यात्मिक तिर्थक्षेत्र आहे. श्री तुळजा भवानी मंदिराच्या वास्तूचे प्रमाण हे १२ व्या शतकातील असून प्रचंड विद्वत्तेने व आध्यात्मिक स्थापत्य शास्त्राने निर्माण झालेले पुरातन वास्तू आहे. श्री तुळजा भवानी मंदिरचे संरक्षण, संवर्धन करूनच येथे येणा-या सर्व भक्तांच्या आस्था, श्रद्धा व भक्ती विचारात घेतले जावेत. श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानने भाविकांना जास्तीत जास्त पायाभूत सोयीसुविधा, सुलभपणे देवि दर्शन तसेच कुलधर्म कुलाचार व्यवस्थितपणे पार पाडण्याकरीता दि. २६ जाने २२ रोजी ठराव क्र. ०५ नुसार महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाच्या पुर्वपरवानगीने विकास आराखडा (DPR) तयार करण्याचे काम हाती घेतले होते.
त्यानंतर समस्त गावकरी, पुजारी व व्यापारी वर्गाचा विरोध झाल्याने मंदिर संस्थानने त्यात बदल करून दुसरा विकास आराखडा (Plan B) तयार केलेला आहे. याबाबत दि.१५/०७/२०२४ ते २३/०७/२०२४ पर्यंत काही सुचना व तक्रारी असतील तर लेखी स्वरूपात मंदिर कार्यालयात सादर करण्याचे जाहीर प्रकटनानुसार कळविलेले होते. परंतू मंदिर संस्थानने देविभक्त, सर्व पुजारी, स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या सुचनांना केराची टोपली दाखवून मनमानी पद्धतीने विकास आराखडा राबवत आहे. मंदिर. १) संस्थानला विनंती
पेज--२👇
आहे की आमच्या खालील मागण्यांचा विचार करूनच कुलधर्म कुलाचाराला प्रथम प्राधान्य देवूनच विकास आराखडा राबविला जावा अन्यथा आम्ही तिव्र अंदोलन हाती घेवू,
१) श्री तुळजा भवानी मातेची ओटीभरण हा विधी भारतीय लोकसंस्कृतीतील खी जीवनामधील ही एक महत्त्वाची रूडी आहे. या पुजेत नवदांपत्य देविची ओटी भरण्याची परंपरा आहे.
२) श्री तुळजा भवानी देविचो पंचामृत अभिषेक पुजा हिंदु धर्मशास्त्रानुसार फार महत्वाची पुजा मानली जाते. या पुजेतील पाच अमृत म्हणजे पवित्र साहित्यांचे मिश्रण ज्यात दूध, दही, साखर, मध व केळीचा समावेश असतो. हे सर्व साहित्य शुद्धताचे आणि समृद्धीचे धोतक समजले जात असते. १) धन प्राप्ती साठी पंचामृतात दुधाचा समावेश केलेला असतो. २) संतती प्राप्ती साठी पंचामृतात दहीचा समावेश केलेला असतो. ३) रोगांना प्रतिकार करता यावा म्हणून पंचामृतात केळीचा समावेश केलेला असतो. ४) मनातील इच्छा पूर्ण होण्याकरीता पंचामृतात मधाचा समावेश केलेला असतो. ५) वृद्धीवाढी साठी पंचामृतात साखरेचा समावेश केलेला असतो. म्हणूनच हिंदु धर्मात पंचामृतास फार पवित्र समजले
जात असते. सर्व कुटुंब मिळून ही पुजा करत असतो.
३) श्री तुळजा भवानी देविची सिंहासन महापुजा या दही, श्रीखंड, व आम्रखंडाची असते. यात देविचे संपूर्ण सिंहासन वरील साहित्याने भरून घेतले जात असते. देविची व कुटुंबाची ओटी भरली जात असते. देविला नैवेद्य दाखवून सर्वांनी पुरणपोळीचा प्रसाद दिला जात असतो. सकाळी पाच व संध्याकाळी दोन असा दररोज सात पुजा होत असतात.
४) श्री तुळजा भवानी मातेचा जागरण गोंधळ हो पुजा भाविकभक्त घरातील मंगल कार्य (लग्न) वगेरे पुर्ण झाल्यानंतर कुलदेवतेस रूढीपरंपरेनुसार गोंधळ पुजा घालण्याची प्रथा आहे.
५) श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात जावळ काढणे. हा हिंदु धर्मातील सोळा संस्कारापैकी एक संस्कार आहे. याठिकाणी जावळ काढल्याने आपल्या बालकास कुठल्याही प्रकारची बाधा होवू नये हीच धारणा भक्तगणात असते.
६) श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरात कुंकूवाचा सडा सौभाग्यवती स्त्री भाविक भक्त आपले सौभाग्य प्राप्तीसाठी व घरी धनधान्याचा सडा विपूल प्रमाणात व्हावा तसेच घरात बरकत यावी याकरीता मंदिरात येवून हळदी कुंकूवाचा सडा टाकून आपला नवस पुर्ण करत असतात. परंतू सध्या मंदिर संस्थानने हा विधी बंद केलेला आहे तो पुर्वरतपणे चालू करून भक्तांना न्याय द्यावा.
७) श्री तुळजा भवानी मातेला कौल मागण्याचा विधी भक्तगण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्याकरीता किवा ते मनातील काम होतय की नाही यासाठी देवीला फुल लावून कौल मागत असतो. परंतू हा हि विधी मंदिरने चुकीचे नियम लावून बंद केलेला पुर्वरतपणे चालू करावा.
८) श्री तुळजा भवानी मंदिरात पुर्वी लग्नसोहळा पार पडला जात होता. आता मंदिरचा विस्तार झाल्यानंतर मंदिर परिसरात पुर्वीप्रमाणेच लग्न सोहळा विधी चालू करावा.
९) श्री तुळजा भवानी मातेस पानाचे व फुलाचे घर बांधून भक्तगण आपल्याला नविन घर मिळावे, जागा मिळावी किंवा घराचे बांधकाम पुर्ण व्हावे यासाठी आपली इच्छा पुर्ण झाल्यास मंदिरात येवून देविच्या गाभा-यात पानाचे घर किंवा फुलांचे घर लावून आपला नवस फेडत असतात.
१०) श्री तुळजा भवानी मातेस आराध बसण्याची प्रथा परंपरा असून याबाबत मंदिर संस्थानकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल जात आहे. चौदा दिवस देवि भक्त किवा पुजारी वर्ग असेल मंदिरातील सर्व धार्मिक विधीला उपस्थित राहुन चाकरी करून दंडवत घेण्याचा विधीसाठी मंदीरने सर्व सोयीसुविधा पुरवून राहण्याची सोय करणे आवश्यक आहे. (२)
११) श्री तुळजा भवानी मातेस माळ परडी पोतचा कुलधर्म कुलाचारातील महत्वाचा मान असतो. भक्तगण आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्या हातुन नियमीत घडावी म्हणून श्रीदेविचे। म्हणून माल परडी पोत घेवन धार्मिक विधी करून आपापल्या घरी पाच घरी जोगवा मागत अस सेवा आपल्या वंशामध्ये अशीच पुढे चालू रहावी व श्री देवी आपल्या कळाचे रक्षण करावे याका पूर्वजांनो हि प्रथा चालू ठेवलेली आहे. भक्तगण श्रीमंत असो की गरीब ही सेवा व विधी अखंड करत असताना कशाची ही तमा न बाळगता ती करत असतात.
१२) श्री तुळजा भवानी मातेस दंडवत हा धार्मिक विधी देविभक्तांकडून आपल्या घरातील एखादे अवघड काम पूर्ण होण्याकरीता नवस केला जात असतो.
१३) श्री तुळजा भवानी मातेस पुर्वपार परंपरेने तीन प्रकारचे नैवेद्य दाखविले जात होते. यात प्रामुख्याने दहीभाताचा, पुरणपोळीचा व मटनाचा समावेश आहे. इतर ही अनेक प्रकारचे नैवेद्य दाखवले जात असत. परंतु मंदिर संस्थान या ही धार्मिक विधी भक्तांच्या बंद पाडून अन्नछत्र काढण्याच्या विचारात आहे हे वास्तविक पाहता चुकीचे आहे. आई तुळजा भवानी माता हो कलदेवता आहे देविभक्तगण हे आपला कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येथे येत असतो हे लक्षात न घेता मंदिर संस्थान चुकीचे धोरणे राबवून काय साध्य करणार हेच कळेना.
१४) श्री दविजीस येणारे भाविक हे श्री तुळजाभवानीच्या नैवेद्रयाकरीता शिधा (दाळ, तांदुळ, गुळ, साखर, तेल, पीठ, मीठ व इतर साहित्य) हे पुजा-याच्या घरी येताना सोबत घेवून येतात व सोबत आणलेला शिधा हा पुजाऱ्यांच्या घरी देवून पुजारी हे त्या शिध्याचा नेवेद्य करुन श्री देविजीस दाखवितात व तोच नैवेद्य भक्तांसाठी प्रसाद म्हणून देतात. ही परंपरा अनादी काळापासुन चालु आहे. परंतु तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत एका खाजगी संस्थेला अन्नछत्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालु असल्याचे समले आहे. असे झाल्यास अनादी काळापासून भाविकांची चालु असलेली नैवेद्य परंपरा खंडीत होणार आहे. त्यामुळे तुळजापूर शहरात अन्नछत्र स्थापन करण्यात येवु नये.
१५) तुळजापूर शहरामध्ये कोणत्याही येणाऱ्या भाविकांसाठी शहरामध्ये कोठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, मुतारी, वैद्यकीय सुविधा या अस्थित्वात नाहीत. असे असताना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत श्री देविची १०८ फुट उंचीची मुर्ती उभा करण्यात येत आहे ज्यासाठी लाखो रुपये खर्च होणार आहे. तुळजापूर शहरामध्ये श्री देविचे मंदिर असताना १०८ फुट मुर्ती उभा करण्याची कोणतीच अवश्यकता नाही. असे झाल्यास तुळजापूमध्ये मंदिराचे महत्व कमी होणार आहे. तसेच शहरात दोन मंदिर उभारण्याचा प्रश्यत्न चालु असल्याची चर्चा नागरीकामधुन होत आहे. त्यामुळे तुळजापूर शहरात १०८ फुट उंचीची श्री देवीजीची मुर्ती उभा न करता त्या रकमेत तुळजापूर शहरातील विविध भागामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, मुतारी, वैद्यकीय सुविधा या करण्यात याव्यात.
१६) तुळजापुर शहारातील घाटशिळ रोड येथील कार पार्किंग २ हे १९ आर ती कारपार्किंग श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानला वर्ग केल्याने नगर परीषद कर्मचारी साफसफाई स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध होत नाही. आज नगर पालिका मोडकळीस आली असुन आर्थिक चलन बंद झाल्याने कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. परंतु श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानकडे करोडो रुपये असुनसुध्दा केवळ जाणुनबुजुन नगर परीषदेच्या राजकीय रोषापोटी घाटशिळ रोडवरील कार पार्किंग श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानकडे वर्ग केले आहे. त्या अनुषगाने परवाच पार्किंगचा लिलाव करुन मंदीर संस्थानकडे पैसे जमा केले आहेत तरी घाटशिळ पार्किंग मंदीर संस्थानकडुन रह करुन नगर परीषद तुळजापुर यांना वर्ग करण्यात यावे. जेणेकरुन नगर परीषद स्वच्छता कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ येणार नाही. तसेच १०८ भक्त निवास हे मंदीर संस्थानकडे असुन तेही नगर परीषदला वर्ग करण्यात यावे. (३)
पेज--४👇
पेज--३👇
१७) श्री तुळजाभवानी मातेचे वंशपरंपरागत रुढी परंपरेपासून गेली शेकडो वर्षापासून मंदिराच्या पुजाऱ्यांची परे हाकेच्या अंतरावर आहेत. कारण पूर्वी मुघल राजवटीमध्ये अफजल खान व इतर मुघलंची आक्रमणे होत होती. त्यावेळी भोपे पुजाच्यांनी मुर्तीचे संरक्षण केले. त्यामुळे या वास्तूंना ऐतिहासीक महत्व आहे. तरी या आराखडयामध्ये पुजा-यांची घरे वगळून दुरुस्ती करुन बदल करण्यात यावे,
१८) श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभा-यात साधरणतः सन १९८० ते १९८२ च्या काळात ग्रेनाईट लावण्यात आले त्यास कोणत्याही शिळेस चिरा नव्हत्या त्यावेळेस पेनाईट फरशी लावताना पुरातन विभागाची परवानगी न घेता नाईट फरशी लावली कशी? पाला जबाबदार असणाऱ्या संबंधीत मंदिर विश्वस्त संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.
१९) श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवतांच्या मुर्ती त्यांच्या मूळ स्थानावर धर्मशास्त्रानुसार स्थापित करण्यात याव्यात. तसेच ब्रम्हदेवाची मूर्ती स्थलांतरीत करीत असताना तोडफोड व भंग झालेली आहे. याला जबाबदार कोण? संबंधीत जबाबदार राज्याचे पुरातन विभाग मंदिर विश्वस्त व जे दोषी असतील त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
२०) श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील दुरुस्ती व बांधकामाच्या नावाखाली वास्तुचलन, होम हावन दोन वेळेस करुनही तीसन्ऱ्यांना करण्याचा मंदिर संस्थानचा घाट घातला असून होम हावनच्या नावाखाली मंदिरच्या पैशाची उधळपट्टी करीत आहेत. ते त्वरीत तात्काळ थांबवण्यात यावी.
या सर्व कुलधर्म कुलाचाराचा विचार करूनच मंदिरचा विकास आराखडा राबविला जावा. परंतू मंदिरचे विश्वस्त तथा आमदार राणा जगजितसिंह पाटिल यांचे सुरूवातीपासूनच जुने प्राचिन मंदिर पाडून नव्याने मंदिर बांधायचे असे ठाम मत असल्याने या कृतीला आमचा विरोध आहे. श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य स्थान ज्यास सिंहासन असे संबोधतात याची वास्तू स्थापत्य शास्त्रानुसार धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टीने योग्य त्या रचनेत आहे त्यामुळे त्यामध्ये कोणताही बदल करू नये, मातेचा मुख्य गाभारा आध्यात्मिक स्थापत्य शास्त्रानुसार अगदी योग्य असून या गाभाऱ्यातील तुटलेले दोन दगडी शिळा केंद्रीय पुरातन वास्तु संवर्धन विभागाच्या सल्ल्याने बदलून किवा दुरूस्तीचे काम केले जावे इतर कसलाही बदल करू नये तसेच मुख्य गाभाऱ्याचे द्वार आहे त्या स्थितीतच जतन, संवर्धन केले जावे. त्याच बरोबर देविभक्तांनी मोठ्या श्रद्धेने देविस आणलेल्या साड्या व दागिणे देविच्या चरणावरती अर्पण करून न घेता मंदिर कार्यालयात जमा करून घेतले जात आहे हा भाविक भक्तांचा अपमान नाही का? अनादर नाही का? श्री तुळजा भवानी मंदिरातील सिंह गाभाऱ्याचा सभामंडप पुर्वीप्रमाणेच ठेवून प्राचिन ठेवाचे जास्तीत जास्त जतन करण्याचा विचार मंदिर संस्थान व राज्याचे पुरातन वास्तु संवर्धन विभागाने करणे अपेक्षित होते पण मंदिरातील सर्व पुरातन ठेवा नष्ट करून मंदिरच नव्याने बांधून स्वतः नाव अजरामर करण्याचा चंगच आमदार यांनी घातलेला दिसतोय.
भवानी शंकर समोरील सभामंडप मोठ्याप्रमाणात दुरूस्ती करून तेथील चांदीचा दरवाजा मोठा करून मंदीर संस्थानने पुरातन विभागाची परवानगी न घेता काढलेला चांदीचा उंबरठा पुर्वापार रूढीपरंपरेप्रमाणे तसेच हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे वसवून गाभाऱ्याचे पावित्र्य राखावे. मातेच्या शेजगृहात श्री तुळजा भवानी मातेचा चांदीचा पलंग आहे तेथेच ठेवावा तसेच श्री तुळजा भवानी मातेच्या (चांदो पलंग गाभारा) शेजगृहाचे पावित्र्य राखून देवि भक्तांना पलंगाच्या बाजूने दर्शनाची सोय करण्यास आमची हरकत नाही यापुर्वी पुरातन विभागाची परवानगी न घेताच पुरातन भिती पाडून नव्याने बांधकाम केल्याने मंदिर संस्थानच्या तहसिलदारावरती गुन्हा दाखल झाला होता श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी व कुलधर्म कुलाचार करण्यासाठी अनेक वृद्ध व अपंग भाविक भक्त मंदिरात येत असतात. या भक्तांची मंदिर संस्थानच्या वतीने मुखदर्शनाची मोफत सोय न करता उलट त्यांच्याकडून मंदिर संस्थान ५००/- ची पावती फाडून दर्शनाची सोय केलेली आहे. या भक्तांची खुप हेळसांड होत असताना याबाबीकडे मंदिर संस्थान केवळ उत्पन्नाचे साधन म्हणूनच पाहतय हे निश्चितच खेदाची बाब आहे. तुळजापूर शहरामध्ये. (४)
पेज----५
केला जात नाही तेथील अतिक्रमणे काढली जात नाही व त्या तिर्थकुंडाचा लाभ देविभक्तांना न देता सधुरा ते असुन अडचण नसून खोळंबा म्हणायची वेळ आलेली आहे. पापणास तिर्थ कुंड शेजारी असलेल वस्तुसंग्रहालय व नाना नानी पार्क विकसित करण्याच्या नावाआड लाखो करोडो रूपये खर्चुन स्वतःची पोट भरून घेतली पण याचा लाभ देवि भक्तांना किंवा शहरवासीयांना कसलाच झालेला नाही.
तरी आपणास आमची विनंती आहे की श्री तुळजा भवानी मंदिर व तुळजापूर शहराचा विकास व्हावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. परंतु श्री तुळजा भवानी मंदिर मधील आध्यात्मिक स्थापत्य शास्त्रीय, पवित्र्य व पुरातन स्थापत्य यांचे संवर्धन व जतन व्हावे तसेच पावित्र्य राखले जावे. यात काळानुसार व वाढती देविभक्तांची संख्यानुसार कुठे दुरूस्तीची आवश्यकता वाटली तर ती केली जावी.
तरी आपणास विनंती की, वरील बाबीचा गांभिर्यपूर्वक विचार करुन श्रीक्षेत्र तुळजापूरातील श्री तुळजा भवानी मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाचा मंजूर होत असलेला विकास आराखड्याबाबत देविभक्त. स्थानिक पुजारी, व्यापारी व नागरीक यांना विचारात घेवुन आराखडा तयार करण्यात यावा ही विनती. अन्यथा नाईलाजास्तव लोकशाही पध्दतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल व वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यावी असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
याप्रसंगी महाविकास आघाडीचे धीरज पाटील श्याम पवार नागनाथ भाऊ भांजे राहुल खपले सुधीर कदम ऋषिकेश मगर तौफिक शेख रामचंद्र ढवळे विकास चव्हाण गोरक्षनाथ पवार रणजीत इंगळे सुरेश कोकरे उत्तम नाना अमृतराव अमर चोपदार संदीप कदम किरण माणिकराव यादव मधुकर शेळके ऋषिकेश मगर इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा