Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २० जुलै, २०२५

*तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत बांधलेल्या भक्तनिवासात तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत मोफत हॉस्पिटल चालवावे---- महाविकास आघाडीची पालकमंत्र्यांकडे मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत बांधण्यात आलेले १२४ भक्त निवास ज्या उद्देशाकरीता बांधण्यात आलेले आहे त्याच उददेशाकरीता बापरण्यात यावा तसेच मंदिर संस्थान रुग्णालय । हॉस्पीटल हे मंदिर मार्फत मोफत चालविण्यात यावे व त्याबाबत काढलेली खाजगी करणाची निविदा रद् करावी अशी मागणी तुळजापूर तालुका व शहर महाविकास आघाडीच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

याबाबत सविस्तर मागणी अशी की

, सन 2012 मध्ये तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत विविध ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या राहण्यासाठी भक्त निवास बांधण्यात आलेले आहेत. परंतु श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान जाहिर प्रगटन करून त्याठिकाणी खाजगी संस्थेला रुग्णालय । हॉस्पीटल देण्याचा घाट घातला आहे. या ठिकाणी भक्त निवास व्हावे ही भाविक, पुजारी, स्थानिकांची इच्छा आहे म्हणजे संस्थांनी रुग्णालय हॉस्पिटल चालू करावे याला कोणाचाही विरोध नाही परंतु काहीजण राजकीय स्वार्थापोटी स्वतःच्या हितासाठी मंदिर संस्थान ला दबाव आणून रुग्णालय हॉस्पिटल खाजगी संस्थेला देण्याचा घाट असून या अनुषंगाने त्याची निविदा ही दोनदा जाहीर प्रसिद्धी द्वारे केलेली असून ती रद्द करून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनी हे रुग्णालय हॉस्पिटल धर्मादाय पद्धतीने मोफत चालवावे जेणेकरून अनेक गोरगरीब रुग्णांची आणि भाविक भक्तांची सोय होईल तरी वरील बाबीचा विचार करून तात्काळ संबंधितांना आदेश द्यावेत ही विनंती निवेदनात केले आहे अन्यथा नाईलाजास्तव महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल व वेळप्रसंगी उच्च न्यायालयात न्याय मागण्यात येईल असाही इशारा महाविकास आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा