Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २६ जुलै, २०२५

*तुळजापूर येथे शिवसेनेच्या वतीने वंचित व अनाथ विद्यार्थ्यांना छत्री वाटप करुन "अनाथांचा नाथ एकनाथ "उपक्रम संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तुळजापूर : "अनाथांचा नात एकनाथ" या भावनिक आणि सेवाभावी संकल्पनेवर आधारित शिवसेना तालुका व शहर शाखेच्या वतीने तुळजापूर शहरात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत जय तुळजाभवानी माता शाळेतील अनाथ आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करून त्यांच्या शिक्षणप्रवासात थोडीशी मदत देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.


या उपक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत येताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन देखील करण्यात आले.


कार्यक्रमामध्ये तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव, शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले, शहर उपाध्यक्ष काकासाहेब चिवचवे, महिला जिल्हा आघाडी मीनाताई सोमांजी, शिवसेना युवा अध्यक्ष सौरभ भोसले, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष गणेश नेपते, महिला शहराध्यक्ष रेखा घोगरे, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, नितीन मस्के, संजय लोंढे, संभाजी नेपते, मोहन भोसले, आफताब तांबोळी, गितेश जवळेकर तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जय तुळजाभवानी माता शाळेच्या वतीने उमाकांत तपसाळे, मुख्याध्यापक गरडसर, सोमवारे सर, पवार सर, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती लोखंडे मॅडम, कुमारी शीलवंत मॅडम, कुमारी डोलारे मॅडम आणि इतर शिक्षक व कर्मचारी वर्गाने उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत केले.




या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेची लोकांशी असलेली नाळ अधोरेखित झाली आहे. शिवसेना तुळजापूर तालुका व शहर शाखेचा हा सामाजिक भान जपणारा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा