Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ जुलै, २०२५

*रोटरी क्लब अकलूज च्या वतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर व औषध वाटप... तर शेतकरी दिनानिमित्त पर्यावरण पूरक उपक्रम --शेवगा शेंगाचे बियाणे वाटप*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

अकलूज -जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने अकलूज येथील सोनाज पेट्रोल पंप च्या आवारात रोटरी क्लबच्या, अकलूज वतीने मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषध वाटप शिबिराचे करण्यात येऊन या शिबिरामध्ये हजारो वारकऱ्यांना आरोग्य तपासणीची सुविधा आणि औषधे देण्यात आली.

या शिबिरा करिता प्रकल्प प्रमुख रो.डॉ.अभिजीत गांधी, रो.डॉ.निनाद फडे, आणि रो.डॉ.अभिजीत मगर यांनी सेवा दिली.

तसेच‌ १ जुलै "शेतकरी दिना"च्या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी पोषणमूल्यांनी भरलेल्या मोरिंगा जातीच्या "शेवगा शेंगांच्या बियांचे" वाटप वारकऱ्यांना करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी नवीन पर्याय आणि पोषणदृष्ट्या फायदेशीर पिकाचा उपयोग होणार आहे असे या उपक्रमासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे रो.मकरंदनाना जामदार यांनी यावेळी सांगितले.



या उपक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.केतन बोरावके, रो.सचिव अजिंक्य जाधव, रो.सीए. नितीन कुदळे, रो.नवनाथ नागणे, रो.कल्पेश पांढरे, रो‌.बबनराव शेंडगे, रो.पांडुरंग सुळ, रो.दिपक फडे, रो.कमलेश शहा, रो.गोमटेश दोशी या सदस्यांनी उपस्थित राहून सेवा दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा