*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी
अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख, सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे, खजिनदार ॲड.अरविंद देडे, सहसचिवा ॲड.मीरा सिंग यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून त्याचा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांनी केले होते.
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, मा. नगरसेवक रियाज भाई हुंडेकरी, अँड शुभम माने, कोमोरो सय्यद, वाहिद विजापूरे, खालील कादरी, समीर हुंडेकरी, तिरुपती परकीपंडला, नासिर शेख, मुसा जहागिरदार, अंबादास म्हेत्रे, गैबी पठाण, यासीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा