*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायतने तेथील औद्योगिक वसाहतींमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त नावाजलेल्या कंपन्यांनी त्यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या करासंदर्भातील बिल द्यावी व नेमलेल्या कर मोजमाप समितीने अहवाल तत्काळ बनवून प्रसिद्ध करून त्या कराची वसुली कारवाई करण्यात यावी याकरिता श्री सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) तथा अध्यक्ष, आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तामलवाडी यांनी २४ जुलै २०२५ रोजी पंचायत समिती तुळजापूर समोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता त्याप्रमाणे ते आंदोलन स्थळी पोहोचल्यानंतर तत्काळ पोलीस प्रशासनातील कर्मचारी व पंचायत समिती तुळजापूर येथील कक्ष अधिकारी तथा कनिष्ठ कक्षा अधिकारी यांनी आत्मदन करण्याकरता आंदोलकाचे मतपरिवर्तन केले व त्याचवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांची महत्त्वाची बैठक चालू असताना सदरील अनर्थ टाळला या विषयाची माहिती विठ्ठल विकास अधिकारी यांना मिळताच त्यांनी आंदोलनकर्त्यास प्रत्यक्ष भेटून बोलले की व आश्वस्त केले आहे की, सदर प्रकरणी कर आकारणी संदर्भात मोजणी करून कर आकारणी यथाश्रिग्रह करण्याचे लेखी पत्र देण्यात आले त्यामुळे आत्मदहनांचा अनर्थ टळला गेला त्यावेळी आंदोलनादौरान प्रशासनामार्फत श्री हेमंत प्र. भिंगारदेवे गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर यांनी औद्योगिक वसाहतीचे मोजमाप करून त्यांचा अहवाल तत्काळ सादर करून त्याप्रमाणे वसुली कारवाई करेल असे कळवले व आशा आशयाचे पत्र प्रशासनाच्यावतीने श्री आकाश सुरनर (पोलीस) श्री पिंपरकर वरिष्ठ कक्ष अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर, श्री पांडागळे, कनिष्ठ कक्ष अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर, यांनी श्री सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) तथा संस्थापक अध्यक्ष आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामलवाडी यांना देऊन प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती केली त्याप्रमाणे श्री सावंत यांनी प्रशासनाच्या विनंतीस मान करून आपले आत्मदहन स्थगित केले आहे व पुढील पंधरा दिवसाच्या आत जर अहवाल तयार झाला नाही व त्याची अमलबजावणी नाही झाल्यास गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी स्वरूपात कळवले आहे याकडे सर्व परिसरातील लोकाचे लक्ष वेधून गेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा