Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २४ जुलै, २०२५

मांसाहारी खवय्यांनी बुधवारी गटारी अमावस्या साजरी करत मोठ्या प्रमाणात मटण, मासळी आणि गावरान कोंबडा व चिकनवर ताव मारला.

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

-----: मांसाहारी खवय्यांनी बुधवारी गटारी अमावस्या साजरी करत मोठ्या प्रमाणात मटण, मासळी आणि गावरान कोंबडा व चिकनवर ताव मारला. आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी (ता. २४) होत असल्याने अनेक जण या दिवशी मांसाहारी खाणे टाळतात. त्यामुळे परीसरातील गावात बुधवारीच गटारी साजरी करत अनेकांनी पार्टीचा बेत आखत शेकडो किलो मटण, चिकन, अंडी व मासळीवर ताव मारला.

    श्रावण महिन्याचा प्रारंभ शुक्रवारी (ता. २५) होणार आहे. श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवातही मांसाहारी पदार्थ वर्ज्य केले जातात. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला खवय्यांच्या भाषेत गटारी असे संबोधिले जाते. मात्र, यंदा आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी होणार आहे. गुरुवारी शक्यतो मांसाहारी पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते.

    मटण, मासळी आणि चिकन खरेदीसाठी बाजारात सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. पिंपरी बुद्रुक, बावडा, अकलूज, गणेशवाडी सह परीसरातील बाजारांमध्येही खरेदीला उधाण आले होते. बावडा, पिंपरी बुद्रुक येथे भिमा व नीरा नदीतून आणलेली रहू, कतला, चिलापी अशी शेकडो किलो मासळीची आवक झाली होती. खवय्यांची राहू, कतला, चिलापी, वाम यांना सर्वाधिक मागणी होती, अशी माहिती व्यापारी दत्तात्रय पतुले, अशोक रजपूत यांनी दिली.

   चिकन, मटणालाही हाॅटेल चालकांकडून मोठी मागणी होती. बावडा, पिंपरी बुद्रुक, अकलूज परिसरातून १,५०० ते २,००० बोकड-मेंढ्या खरेदी करण्यात आल्या होत्या. मटण दुकानदार मुबारक शेख यांनी सांगितले की, विक्रेत्यांनी अकलूजसह शेजारील जिल्ह्यांतून मटणासाठी बोकड, गावरान कोंबड्या खरेदी केली होती. चिकनलाही जोरदार मागणी असून, सुमारे ३०० ते ५०० किलोची विक्री परीसरात झाल्याचे अस्लम मुलाणी यांनी सांगितले. अंडी मात्र स्वस्त झाली असून, शेकड्याला ७०० रुपयांचा दर होता.


मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर

# मटण.....७८० ते ८०० रुपये

# चिकन.... २०० रुपये

# चिलापी... १३० ते १५० रुपये

# रव.... १८० ते २२० रुपये

# कतला..... २०० ते २२० रुपये

# गावरान कोंबडा...५०० ते ७०० रूपये

# गावरान अंडी...७०० ते १००० शेकडा

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा