उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
ॲड. फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा या ठिकाणी अधिवक्ता आहे सन 2012 पासून त्या वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. कायदेविषयक शिबिरा मार्फत सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे कार्यक्रम,अंगणवाडी,शाळा, महाविद्यालय, बचत गटातील महिलांचे कार्यक्रम तसेच महिलांशी संबंधित इतर कार्यक्रमाच्या सर्व प्रकारच्या वरील घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे हक्क,जबाबदाऱ्या व तसेच उज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण, सशक्तिकरण सबलीकरण आणि जागरूकता आणण्याचे कार्य करीत असतात तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लेख, व्याख्यान माध्यमातून त्यांचे विचार जनमानसां पर्यंत पोहोचविणे व विविध विषयावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत असतात. तसेच विधी सेवा समिती उमरगा तालुका चिकित्सालय कक्ष दाबका या ठिकाणी विधीज्ञ सल्लागार आहेत.तसेच विविध विषयांवर स्वरचित काव्य लेखन करून आपले विचार मांडत असतात. त्यांच्या कविता दै.साहित्य तेज,सा.अव्यक्त अबोली,दै.वर्ल्ड व्हिजन टाइम्स, सा. साहित्य भरारी इ. वृत्तपत्रात प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कार्यांची दखल घेऊन सामाजिक सेवा गौरव पुरस्कार, वनश्री पुरस्कार, ग्राम पंचायत दाबकाच्या वतिने अहिल्याबाई होळकर पुरस्कार, काव्य लेखन ई-पुरस्कार, लेखणी रत्न साहित्य ई-पुरस्कार, राज्यस्तरीय महाराष्ट्र युवा नारीशक्ती भूषण पुरस्कार, राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, युगश्री फातिमाबी समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार, ग्रामपंचायत कार्यालय दाळिंबच्या वतीने कर्तृत्ववान महिला पुरस्कार, स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार, राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार, महाराष्ट्र समाजरत्न गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहे.
माझी लेखणी साहित्य मंच आयोजित दुसरे कवी संमेलन व प्रातिनिधिक पुस्तक सोहळा शुभ मंगल कार्यालय, आसनगाव येथे रविवारी दि.25 मे 2025 रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष कविवर्य प्रा. जगदीश संसारे,स्वागताध्यक्ष मा.रविंद्र गाडगीळ, प्रमुख अतिथी मा. विजया माणगावकर, विशेष अतिथी मा. शर्मिला पाटोळे तसेच माझी लेखणी मंचाचे संस्थापक व अध्यक्ष मा.संदीप जगताप, कार्याध्यक्षा मा. रजनी अहेरराव,महिलाध्यक्षा स्वप्न बेलदार तसेच प्रशासिका सुरेखा दुग्गे, धनश्री साबळे,संगीता पाटील, मानसी आंब्रे, राजश्री कामठे, स्मिता गजे मान्यवरांच्या उपस्थितीत ॲड.फरहीन खान-पटेल यांना राज्यस्तरीय रक्षाबंधन काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा