उपसंपादक -नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर येथील तांबोळी समाजसेवा संस्थेचे संस्थापक सचिव आणि अखिल स्तरीय महाराष्ट्र राज्य महा सेवा संघाचे पुणे विभागीय उपाध्यक्ष रियाज भाई मकबुलभाई तांबोळी यांनी मुस्लिम समाजातील सर्वच घटकासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अंजुमन अंबोलियन जमात महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन "समाज गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
सतत समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेणारे तसेच समाजात जे काही रंजले गांजले आहेत त्यांना शैक्षणिक सवलतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रे अथवा दाखले देण्याचे कार्य ते करत असतात कोणाचा उत्पन्नाचा दाखला असो रहिवासी दाखला असो किंवा जातीचा दाखला असो समाजात एखादा गरीब विद्यार्थी असेल त्याची परिस्थिती नसेल त्याला सहकार्य करण्याचा त्यांचा सतत मदतीचा हात असतो त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून आणि योग्य व्यक्तीला, योग्य वेळी, योग्य पुरस्कार, दिल्याने. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
याप्रसंगी करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अल्ताफशेठ उस्मान शेठ तांबोळी यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला
तसेच यावेळी अंजुमन तंबोलियन जमा चे राज्य अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी करमाळेकर बार्शीचे माजी नगराध्यक्ष व अंजुमन तंबोलीयन जमात चे सल्लागार ऍड. आसिफ भाई तांबोळी मान्यवर उपस्थित होते
रियाज भाई तांबोळी यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल "*टाइम्स 45 न्यूज मराठी"* परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा