*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- श्रीराम मंदिर इंदापूर येथील श्रावण बाळ अनाथ आश्रमातील मुलांना शिक्षक समिती शाखा इंदापूर यांचे वतीने शिक्षक समितीच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त किराणा, स्वच्छता साहित्य व पखवाज भेट देण्यात आले. सुरुवातीला शिक्षक समितीचे संस्थापक भावा शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ यांनी शिक्षक समिती गेली ६० वर्षापासून शालेय विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अविरतपणे काम करत आहे. त्याग आणि सेवा हे ब्रीद घेऊन शिक्षकावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सातत्याने लढा उभारण्याचे काम शिक्षक समितीच्या माध्यमातून होत आहे. यावेळी ज्ञानदेव बागल, सुनील शिंदे, संतोष हेगडे यांनी मनोगते व्यक्त केली. या माध्यमातून मुलांमध्ये सांस्कृतिक जाणीव व संगीतप्रेम जोपासण्याचा उद्देश होता. ही कृती म्हणजे केवळ मदत नव्हे, तर आपुलकीचा हात पुढे करणं आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षक केवळ ज्ञान देणारेच नाहीत, तर समाज घडविणारे प्रेरणास्त्रोत देखील आहेत, यामधून अधोरेखित झालं.
याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव बागल, इंदापूर शाखेचे अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा नेते हरीश काळे, संजय लोहार, हनुमंत दराडे, विलास पानसरे, संदिपान लावंड, मोहन लोंढे, दत्तात्रय मखरे, शहाजी पोफळे, वामन गायकवाड, सतीश खटके, विलास शिंदे, दिलीप पोळ, बापूराव राऊत, प्रताप शिरसट, भारत ननवरे, सुरेश माने, सचिन गायकवाड, प्रमोदकुमार कुदळे, मोहन भगत, विकास भोसले, मैनुद्दीन मोमीन, लतीफ तांबोळी, दिलीप अभंग, सोपान अवताडे, भारत गायकवाड, राहुल लांबते, विनोद घोगरे, सागर रणसिंग, रवींद्र लोखंडे, मनोहर जाधव, सचिन कोळी, प्रवीण कुपकर, महेश थांबद, किरण घाडगे, शशिकांत कावळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन संजय भोंग व सरचिटणीस विनय मखरे यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय पाटील यांनी केले सूत्रसंचालन संजय लोहार यांनी केले व आभार कोषाध्यक्ष दत्तात्रय लकडे यांनी मानले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा