Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १४ जुलै, २०२५

पिंपरी बुद्रुक ( इंदापूर ) येथे संत दानाअप्पा महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने भंडाऱ्याचे व भारूडाचे आयोजन

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर - 8378081147*

----- जोहार मायबाप जोहार, आईचा जोगवा जोगवा मागेन या व अशा पद्धतीच्या भारूडाच्या ओव्यातून समाजाचे प्रबोधन भारूडकार कापसे महाराज ( बार्शी ) यांनी केले. 

      पिंपरी बुद्रुक ( इंदापूर ) येथील तुळजाभवानी माता मंदिराच्या आवारात संत दानाअप्पा महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने भंडाऱ्याचे व भारूडाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारूडकार कापसे महाराज ( बार्शी ) यांचा लोकप्रबोधनात्मक भारूडाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील भजनी मंडळ, वारकरी, विनेकरी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      यावेळी तबलासाथ रामचंद्र शेळके महाराज, हार्मोनीयम, विनेकरी यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत दानाअप्पा महाराज यांच्या पालखीला ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. काल्याचे कीर्तन रामचंद्र शेळके महाराज यांचे होवून उपस्थित ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटपाने सांगता करण्यात आली. लोकनेते कै महादेवराव बोडके दादा यांनी ग्रामस्थांना घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे अनेक वर्षापासून पुण्यतिथी साजरी केली जाते. 

फोटो - पिंपरी बुद्रुक येथे संत दानाअप्पा महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने भारूड सादर करताना कापसे महाराज.

..............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा