उपसंपादक -नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
गावातील युवा पिढीच्या कर्तव्य तत्त्परतेमुळे गावाचा विकास प्रगती पथावर.
माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील छोटेसे गाव गणेशगाव आहे येथील सर्व धर्मातील व पंथातील नागरिक एकोप्याने रहात आहेत.गावातील सर्व कामे एका विचाराने होत असल्यामुळे गावाची प्रगती दिवसे दिवस होताना दिसून येत आहे.
गणेशगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानाला पावसाळ्यात तळ्याचे रूप येत होते व पाण्यातून दलदलीतून रस्ता शोधत चिमुकली मुले चिखलातून शाळेचा रस्ता शोधत तर कधी पाय घसरून पाण्यात पडत शाळेतील मुले कसे बसे वर्गापर्यंत पोहचत होते.पाझर लागुन होत असलेली दलदल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या निदर्शनात येताच विध्यार्थींचे होणारे हाल पाहून ग्रामस्थांनी लोकसहभाग व लोकवर्गणीतुन ३०० फुट लांब व ३-४ फुट खोल चारी घेऊन त्यामध्ये ३०० फुट पाझर पाईप टाकून मैदानाची दुरुस्ती केली.यासाठी जवळ जवळ ५० हाजरांच्या आसपास खर्च आला तो संपूर्ण खर्च लोकवर्गणीतून करुन गावातील नागरिकांनी एक आदर्श निर्माण केला आहे.आता कितीही पाऊस आला तर आता मैदानात चिखल होत नाही ना पावसाचे पाणी साठत नाही.ग्रामस्थांच्या या योगदानामुळे विद्यार्थी आनंदाने आता शाळेत जाऊ लागले आहेत.यामुळे गणेशगाव ग्रामस्थांनी विकासाची तालुक्यात वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा