Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

*शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार उत्तमराव जानकर यांचे वाढदिवसानिमित्त "तांबवे "येथे 327 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी*

 


*उपसंपादक -नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे आणी माळशिरसचे दमदार आमदार उत्तम जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवा सेनेच्या वतीने तांबवे या गावामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

           या शिबिराचे उदघाट्न शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना उपनेते शरद दाद कोळी,आमदार उत्तम जानकर, अकलूज गावचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, शिवसेना महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक उद्धव कदम,डॉ.एम.के. इनामदार,शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे,अजय दासरी, आशाताई टोणपे,पोलीस उपनिक्षक गणेश चौधरी,नामदेव वाघमारे, संतोष राऊत,महादेव बंडगर,अनिल बनपट्टे,लक्ष्मण डोईफोडे,नवनाथ मगर,गोरख पवार त्यादी उपस्थित होते.

         युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे हे उद्धवजी ठाकरे आणी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार उत्तम जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करीत असतो.याआधी संगम,वाघोली या ठिकाणी आयोजन केले होते.या वेळेस तांबवे या गावामध्ये आयोजित केले होते या शिबिरामध्ये 327 रुग्णांची आरोग्याची मोफत तपासणीचा लाभ घेतला.या शिबिरास माणसातील देवमाणूस डॉ.एम.के.इनामदार, डॉ.धनेश गांधी,डॉ.विवेक गुजर, डॉ.एस.एन.कुलकर्णी,डॉ.समीर बंडगर,डॉ.रावसाहेब गुळवे,डॉ. श्रीकांत देवडीकर,डॉ.विश्वास कदम, डॉ.संतोष खडतरे,डॉ.निनाद फडे, डॉ.विद्या एकतपुरे,डॉ.अर्चना गवळी, डॉ.सोनाली कटके,डॉ.मेधा कदम-गायकवाड,डॉ.अमोल माने-शेंडगे,डॉ.स्नेहल इनामदार,डॉ. अस्लम शेख,डॉ.हर्षवर्धन हाके, डॉ.ईर्शाद पठाण आदी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.यामध्ये धनंजय सैब यांचे कॉलरी मेथड मसाज सेवेचेही आयोजन केले होते. डोळ्यांचे डॉ.संकेत गडदे यांनीही डोळ्यांच्या रुग्णांची तपासणी केली.

            हे शिबीर पार पाडण्यासाठी काका इनामदार,निसरभाई खान, बाळासाहेब काकडे,रवी इनामदार, तेजमल कोळेकर,दशरथ लवटे, शहाजी कदम,अशोक कदम,नागेश भैय्या जाधव,सतीश कोळेकर, माऊली लवटे आदिनी हे मोफत आरोग्य शिबीर पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा