Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

*अकलूज पोलीस स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई कौतुकास्पद* *सोन्याच्या बांगड्या व गंठण चोरणाऱ्या पुणे येथील ४ महिलांना अटक--* *१० लाखाचा मुद्देमाल हस्तगत*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

अकलुज पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौतुकास्पद कारवाई "अकलूज बस स्थानकावर प्रवासी महिलांचे दहा लाखाचे सोन्याच्या बांगड्या व गंठण लंपास करणाऱ्या पुणे येथील चार महिलांना 24 तासाच्या आत अटक करून दहा लाखाचा म** हस्तगत केला याबाबत सविस्तर वृत्त असे की


दिनांक ०४/०८/२०२५ रोजी दुपारी ०१.३० वाचे सुमारास फिर्यादी महिला या अकलुज बस स्थानक येथुन बसने पुणे येथे जाण्यासाठी निघाले असताना बस मध्ये चढताना गर्दीमध्ये कोणीतरी अज्ञाताने फिर्यादी यांच्या पर्समधील सोन्याच्या बांगडया व गंठन असा अंदाजे १० लाख रुपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे चोरी केले होते. त्यावरुन अकलुज पोलीस ठाणे गुरन नंबर ५४५/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.


सदर गुन्हा नोंद होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ अकलुज बस स्थानक, अकलुज नगरपरिषद सीसीटिव्ही व रस्त्यावरील दुकानाची सीसीटिव्ही कॉमे-याची पाहणी केली असता ४ संशयीत महिला या रिक्षाने टेंभुर्णी रोडने गेल्याचे दिसुन आले अकलुज ते टेंभुर्णी रोडवरील तसेच टेंभुर्णी शहरातील असे एकुण ३० ते ३५ सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन व त्यांचे तत्रिंक विश्लेषण करुन त्याव्दारे टेंभुर्णी येथुन पळून जाण्याच्या तयारी असताना महिला नामे १) एकता कैलास उपाध्ये वय -२४ वर्षे राहणार मेडिकल कॉलेज शेजारी बापुनगर सेडमनगर कलबुर्गी सध्या राहणार - वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर येरवडा पुणे २) ननीता दिनेश कांबळे वय ३५ वर्षे राहणार वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर येरवडा पुणे ३) सुनिता शाखा सकट वय -४५ राहणार - वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर येरवडा पुणे ४) आरती मेघराज उपाध्य वय ३० वर्षे राहणार वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर येरवडा पुणे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली त्यांचेकडुन वर नमुद गुन्हयातील चोरी केलेला १० तोळे व यापुर्वी अकलुज बस स्थानाकातुन ३ वेगवेगळ्या गुन्हयातील चोरी केलेले चार तोळे असे एकुण अंदाजे १४ लाख रुपये किंमतीचे १४ तोळे वजानाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर महिला या सराईत असुन यांचेवर यापुर्वी आंळद पोलीस ठाणे राज्य कर्नाटक, वाई पोलीस ठाणे जिल्हा सातारा, वारजे माळेवाडी, शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर असे वेगवेगळे पोलीस ठाणेस गुन्हे नोंद आहेत.



सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे, पोलीस हवालदार सुहास क्षिरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, विनोद साठे, सिध्दु कंटोळी, बबलु गाडे, मपोहे मदाकिनी चव्हाण, चालक राहुल नागरगोजे, पोलीस अमंलदार सोमनाथ माने, रणजित जगताप, प्रविण हिंगणगावकर, महिला पोलीस अमंलदार पुनम शिंदेयांनी कामगिरी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा