Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

सामाजिक समतोल राखत, सर्वांना बरोबर घेतल्याने गाव विकासामध्ये अग्रभागी-हर्षवर्धन पाटील •बावडा येथे विकास कामांची भूमिपूजने संपन्न


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

-----सर्वसामान्य नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व राहण्यासाठी घर महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने घरकुल योजनेचा सर्व्हे केल्याने बावडा ग्रामपंचायतीचा जिल्हामध्ये गौरव झाला आहे. आता नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे बावडा ग्रामस्थांनी आगामी 50 वर्षे पिण्याच्या पाण्याची काळजी करू नये. सामाजिक समतोल राखत, सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याने विकास कामांमध्ये गाव अग्रभागी राहिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे रविवारी (दि. 24) केले.

          बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजने (रु. 12. 05 कोटी) च्या 4 ठिकाणी बांधावयाच्या उंच साठवण टाक्यांचे भूमिपूजन, शॉपिंग सेंटर उभारणी व ग्रामसचिवालसमोर प्लेविंग ब्लॉक (रु. 25 लाख) टाकणे आदी कामांचे भूमिपूजन तसेच लोकनेते शहाजीराव (बापू) पाटील प्रवेशद्वार (गाव वेस ) चे लोकार्पण हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव घोगरे होते.



        हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत गावासाठी प्रथमतः 6 कोटीची योजना प्रस्तावित होती. मात्र पुढील 50 वर्षांचा विचार करता सदर योजनेत भीमा नदीवरून नवीन स्वतंत्र पाईपलाईन टाकून गावामध्ये 1) रत्नप्रभादेवीनगर 2) घोगरेवस्ती  3)बारावाफाटा, 4) बागलफाटा येथे उंच साठवण पाणी टाक्या उभारण्यात येणार आहेत. या पाणी साठवण टाक्यांची आज आपण भूमिपूजन केले आहेत. गावासाठी रु. 12 कोटी 5 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ मंजुरी दिली आहे.

      गावामध्ये आता 441 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यातील काहींना आज प्रातिनिधीक स्वरूपात आपण प्रमाणपत्रे वाटप केलेले आहे. नुकताच गावामध्ये नव्याने घरकुलांसाठी सर्व्हे करण्यात आला असून त्यामध्ये 1786 लाभार्थीं कुटुंबाचा सर्व्हे झाला आहे, यांना आगामी काळात घरकुल मिळतील. तसेच गावामध्ये सन 2001 ते 2011 पर्यंतच्या अतिक्रमण जागेतील 954 कुटुंबांची घरकुले  त्यांच्या नावावर होणार आहेत. तसेच गावामध्ये तरुणांसाठी हायस्कूल वर 400 मीटरचा ट्रॅक बनवण्यात येईल, तसेच अत्याधुनिक जिम उभारण्यात येईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राजकारणामध्ये केवळ राजकारणासाठी विरोध करणे, व्यक्तीद्वेष करणे अशी आपल्या गावाची संस्कृती नसल्याचे त्यांनी सांगितले. मी बावडेकर आहोत, याचा मला रास्त अभिमान असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.



   यावेळी बोलताना अशोकराव घोगरे यांनी सांगितले की, नेत्याला विकासाची दूरदृष्टी असावी लागते, त्या दृष्टितूनच हर्षवर्धन पाटील यांनी गावासाठी 12 कोटी 5 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. गावामध्ये 32 पर्यंत दलित वस्त्या वाढविल्याने विकास कामे झाल्याचे त्यांनी सांगितले.

      यावेळी बोलताना निरा भीमा कारखान्याचे माजी संचालक उदयसिंह पाटील यांनी सांगितले की, प्रधानमंत्री घरकुल योजनेचा आपण शिक्षकांची मदत घेऊन शिस्तबद्ध सर्व्हे केल्याने आता त्यामध्ये नव्याने सुमारे 1786 कुटुंबाचा सर्व्हे झाला आहे, त्यामुळे या कुटुंबांना आगामी काळात एकूण सुमारे 35 ते 36 कोटी रुपये निधी मिळेल.



        यावेळी बावडा गावातील हनुमान मंदिरासमोर हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी सुमारे 17 लाख रुपये खर्चून बांधलेल्या लोकनेते शहाजीराव (बापू) पाटील प्रवेशद्वार (गाव वेस ) चे उद्घाटनही हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच रणजित घोगरे यांनी केले. यावेळी समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे, सरपंच पल्लवी गिरमे, जल जीवन मिशनचे अभियंता सुधीर गोरे यांची भाषणे झाली. 



 यावेळी पाण्याच्या टाकीसाठी मोफत जागा दिलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे सह माऊली घोगरे, रणजीत गिरमे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

        यावेळी मनोज पाटील, माजी सरपंच किरण पाटील, अँड.अनिल पाटील, अमरसिंह पाटील, हरिभाऊ बागल, संतोष पाटील, विकास पाटील, प्रसाद पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, रणधीर पाटील, सुधीर पाटील, विजय घोगरे, मिलिंद पाटील, नामदेव घोगरे, विजय जगताप, इन्नूस मुलाणी, शिवाजीराव पवार, भगवान पांढरे, समीर मुलाणी, पवनराजे घोगरे, लक्ष्मण घोगरे, बाजीराव घोगरे, मुनीर आतार, संपत चव्हाण, विठ्ठल घोगरे, बलभीम घोगरे, तानाजीराव गायकवाड, रणजित गिरमे, संतोष सूर्यवंशी, काशिनाथ गायकवाड, अमोल घोगरे, स्वप्नील घोगरे, दादा कांबळे, धनंजय राऊत, मंगेश कांबळे, महादेव शिंदे, वसंत शेंडगे, दिलीप नायकुडे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे आदींसह ग्रा.पं. सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कालिदास आवाड यांनी केले. 

•चौकट: 

जल जीवन मिशनची रु. 12. 05 कोटीची योजना

 - हर्षवर्धन पाटील 

--------------------------------

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची बंगल्यावरती भेट घेऊन बावडा गावासाठी जल जीवन मिशनची रु. 6 कोटी ऐवजी रु. 12. 05 कोटी निधीची योजना मंजूर करून घेतली आहे. राज्यात 20 वर्षे कॅबिनेटमध्ये म्हणून काम करताना आपण राजकारण न करता सर्वांना मोठी मदत केली आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

•चौकट: 

बावडा येथे पोलीस स्टेशन इमारतीसाठी 4 कोटी- हर्षवर्धन पाटील 

--------------------------------

बावडा गावची लोकसंख्या वाढत असल्याने कायदा सुव्यवस्था चांगली राहणे आवश्यक आहे. त्यासाठी बावडा येथे सध्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन इमारत उभारणीचा प्रस्ताव असून, जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून सदरचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. यासंदर्भात गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 4  कोटी रुपयांच्या पोलीस स्टेशन इमारतीचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. माळेगाव पोलीस स्टेशन प्रमाणे सदरची इमारत होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

_____________________________

फोटो:-बावडा येथे ग्रा.पं.च्या वतीने आयोजित विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा