संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील चंदवा गावात जाऊन खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून मोची समाजाचे सुपुत्र, महान समाजसुधारक, भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. बाबू जगजीवनराम यांना अभिवादन करण्यात आले*
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने खासदार प्रणिती शिंदे यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार छाननी समितीत निवड केली असून त्या सध्या बिहार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज त्यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान व दलित, शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे समाजसुधारक, *मोची समाजाचे सुपुत्र स्व. बाबू जगजीवनराम यांच्या जन्मगाव चंदवा (जि. भोजपूर, बिहार) येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.*
यावेळी बक्सर चे आमदार संजय कुमार तिवारी, राजपूरचे आमदार विश्वनाथ राम, करगहरचे आमदार संतोषकुमार मिश्रा, रोहित पासवान, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हरेंद्र पांडे यांच्यासह इतर नेतेमंडळी उपस्थित होते.
बाबू जगजीवनराम यांनी स्वातंत्र्यलढा, संविधान निर्मिती, सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्यात भक्कम भूमिका बजावली. त्यांनी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेज लीग (१९३५) ची स्थापना केली, १९४६ मध्ये अंतरिम सरकारमध्ये पहिले दलित मंत्री म्हणून कार्य केले. कृषी मंत्रीपदावर असताना हरितक्रांतीसाठी मोठा हातभार लावला, तर १९७१ च्या भारत–पाक युद्धात संरक्षण मंत्री म्हणून महत्वाची भूमिका निभावली. १९७९ मध्ये ते भारताचे उपपंतप्रधान झाले.
“बाबूजींचे जीवन कार्य हे सामाजिक न्याय, समानता आणि समावेशक विकासाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या आदर्शांमुळेच समाजातील वंचित, उपेक्षित वर्गाला सन्मानाचे स्थान मिळाले. त्यांचे कार्य आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा