Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

माळशिरस तालुक्यात अवैध धंद्यामध्ये पोलिसांची भागीदारी असेल तर धंदे कसे बंद होणार-- -खासदार ,धैर्यशील मोहिते पाटील यांचा पोलीस प्रशासनाला सवाल?


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448

माळशिरस तालुक्यात अवैध धंदे मोठ्या जोमाने राजरोसपणे सुरू आहेत त्यात या अवैध धंद्यात स्थानिक पोलिसच भागीदार असल्याचा गंभीर व सनसनाटी आरोप माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे खा मोहिते पाटील यांनी केलेला हा धक्कादायक आरोप माळशिरस तालुक्यातील कायदा सुव्यवस्था व येथील यंत्रणेचा नंगानाच म्हणायचा की पराभव म्हणायचा खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे एसपी महानिरीक्षक यांना या बाबतचे पुरावे देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी माळशिरस चे आमदार उत्तमराव जानकर यांनी तालुक्यातील दोन नंबर धंद्याच्या विरोधात आवाज उठवला होता तसेच विधानसभेत ही आवाज उठवला होता त्यावेळी काही दिवस दोन नंबर धंदे बंद असल्याचे दिसून आले मात्र महिन्यात पुन्हा दोन नंबर धंद्यानी उसळली घेतली व उघडपणे मटका जुगार हातभट्टी दारू गुटखा सुरू झाला आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले होते मी जोपर्यंत माळशिरस तालुक्याचा आमदार आहे तोपर्यंत माळशिरस तालुक्यात अवैध धंदे चालू देणार नाही असे असताना काही दिवसांतच दोन नंबर धंद्यांना अचानक कोण पाठींबा देतो व आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही पुन्हा मटका जुगार हातभट्टी दारू गुटखा सुरू करणारच म्हणून छातीठोकपणे दोन नंबर सुरू करतात ही बाब निश्चितच कायदा सुव्यवस्थेला उघड आवाहन देणारे आहे विद्यमान आमदार दोन नंबर धंद्याच्या विरोधात आवाज उठवतात तर त्यांच्या त्या आवाहनाला दोन नंबर धंदे करणारे जराही जुमानत नाहीत हे त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तालुक्यातील राज्यातील अदृश्य राजकीय शक्ती ठाम उभी असल्या शिवाय हे शक्य नाही यामध्ये राजकीय खेळी खेळली जात आहे हे जनतेच्या लक्षात येत नाही अशातला भाग नाही दुर्देव असे की दोन नंबर धंद्यात काही पोलीस सामील आहेत ही बाब निश्चितच धोकादायक गंभीर तर आहेच परंतु कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची व कायद्याचे रक्षण करण्याची त्यांचेवर नैतिक जबाबदारी आहे तेच कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवत असतील तर मात्र ही परिस्थिती चिंताजनक आहे खासदारांनी जर त्यांच्या कडे या बाबत ठोस पुरावे असतील तर ते गृह मंत्रालय यांचेकडे सादर करून संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यास भाग पाडावे अशी चर्चा जनतेतून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा