Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

सारा गौरव कला व क्रीडा मंडळ आयोजित नृत्य स्पर्धा जल्लोषात संपन्न* *स्पर्धकांच्या नृत्य कलेच्या जादूने प्रेक्षक मंत्रमुग्ध


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

सारा गौरव कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खुल्या नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी वयोगट 8 ते 18 या मुलामुलींसाठी आयोजित या स्पर्धेला प्रचंड उत्साहाचे वातावरण लाभले. लहान चिमुकल्यांपासून ते तरुणाईपर्यंत सर्वच स्पर्धकांनी आपल्या नृत्यकलेच्या जादूने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.


या स्पर्धेचे उद्घाटन सिनेअभिनेता श्री. उमेश (बाप्पा) जगताप, समाजसेवक श्री. नारायण (भाऊ) नन्नवरे, अॅड. संजय पवार (साहेब), श्री. अजिंक्य भैय्या नन्नवरे, तसेच उदय (आणा) अमृतराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी नृत्यकलेचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले व तरुणाईला प्रोत्साहन देणारे विचार मांडले.


स्पर्धेत भातंब्री ग्रुप व जवाहर नवोदय विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदाचा मान मिळवला. द्वितीय क्रमांकावर कु. दुर्वा सुहास टोले व कु. अंजली अमोल जाधव यांचा मनोहारी नृत्याविष्कार ठरला. तर तृतीय क्रमांक कु. जास्मिन मुलानी व कु. संस्कार रामेश्वर यादव यांनी पटकावला.

विशेष उल्लेखनीय म्हणजे कु. विनायक रवींद्र वडगावकर याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


विजेत्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण मा. श्री. अमोल (भैय्या) कुतवळ, अॅड. संजय पवार साहेब व उदय आणा अमृतराव यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांनी यावेळी सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे आधारस्तंभ गणेश( भैय्या )पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष विश्वदीप लंगडे, उपाध्यक्ष शिवराज ठोंबरे व प्रणव (भैय्या) चव्हाण, कोषाध्यक्ष समाधान डोलारे, सचिव अतुल वट्टे, अंकित कडतने, तसेच कार्यकर्ते श्री. भरणाळे आदींचा मोलाचा सहभाग राहिला.


स्थानिक नागरिक, पालक व तरुण वर्गाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नृत्यकलेच्या माध्यमातून प्रतिभावंत मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंडळाचे हे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा