*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा परिसरातील ग्रामपंचायती, विद्यालये, प्राथमिक शाळा, शासकीय, निमशासकीय संस्थातून उत्साहात, जल्लोषात संपन्न झाला. तसेच वह्या व मिठाई वाटपाने व सांस्कृतीक कार्यक्रमाने संपन्न झाला.
नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेमध्ये सरपंच अर्चना नितीन सरवदे यांच्या हस्ते उपसरपंच गुरूदत्त गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक बाळासाहेब वाघमोडे, आनंद काकडे, दशरथ राऊत, विठ्ठल देशमुख, अश्विनी सरवदे, नितीन सरवदे यांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले. नितीन सरवदे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दहा विद्यार्थ्यांना दफ्तराचे वाटप करण्यात आले.
गिरवी ( ता . इंदापूर ) येथे ग्रामपंचायतमध्ये सरपंच सौ. पार्वती पांडुरंग डिसले, उपसरपंच दादासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते झेंडावंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुर्यकांत शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात पोपट भरत बोडके यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालय समोर प्रविण झुंजर बोडके यांनी झेंडावंदन केले. टणू ग्रामपंचायत कार्यालय समोर सरपंच तेजस मोहिते यांनी झेंडावंदन केले.
फोटो - नीरा नरसिंहपूर ( ता इंदापूर ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अर्चना सरवदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
.....................................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा