*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहोकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज संचलित धनशैल्य विद्यालय गिरझणी व किडझी अकलूज येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निवृत्त भारतीय सेना अधिकारी नायक हिम्मतराव बळवंतराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध भाषांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभावी भाषणे करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.बाल चिमुकल्यांपासून उच्च वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष मनिष गायकवाड म्हणाले की,बालवयातच अशा उपक्रमांद्वारे राष्ट्रगीत,देशभक्ती आणि राष्ट्रभावना मुलांच्या मनात रुजवणे हा धनशैल्य शिक्षण संस्था, अकलूज यांचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे सर्व शिक्षकवृंद,शैक्षणिक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या सोहळ्यास मोठ्या संख्येने पालक आणि नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा