Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

खून् व इतर गुन्ह्यातील आरोपी राजू भाळेसह अन्य १२ जणांवर मकोकाची कारवाई वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई...

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 837808114

-----पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात दहशत माजवून सातत्याने योजनाबद्ध गुन्हे करणाऱ्या राजेंद्र उर्फ राजू महादेव भाळे यांच्या टोळीतील १३ सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांनी दिली.

     इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे २७ फेब्रुवारी २५ रोजी उत्तम जालिंदर जाधव (वय 34, रा. खोरोची) यांची दगडाने ठेचून व कोयत्याने वार करून निघृण हत्या करण्यात आली होती. हत्येत १३ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांनी मुख्य आरोपी राजेंद्र उर्फ राजू महादेव भाळे (रा. खोरोची), रामदास उर्फ रामा शिवाजी भाडे (रा. खोरोची), शुभम उर्फ दादा बापू आटोळे (रा. शेळगाव), स्वप्निल बबन वाघमोडे (रा. रेडणी), नाना भागवत भाळे (रा. खोरोची), निरंजन लहू पवार (रा. खोरोची), तुकाराम ज्ञानदेव खरात (रा. खोरोची), मयूर उर्फ जीजा मोहन पाटोळे (रा. निमसाखर), अशोक बाळू यादव (रा. शेळगाव), धनाजी गोविंद मसुगडे (रा. कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सोमनाथ बबन पवार (रा. कळंब), सनी विलास हरिहर (रा. अंथुर्णे) आणि अक्षय भरत शिंगाडे (रा. शेळगाव) यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली.

      राजू भाळे याच्यावर १२ गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर, माळशिरस, नातेपुते या भागांमध्ये वर्चस्व वाढवण्यासाठी तो नियोजनबद्ध पद्धतीने गंभीर गुन्हे करत होता. टोळीच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी वालचंदनगर पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे.

      गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काळात जास्तीत जास्त गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई होईल, असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी यावेळी दिला.

       सदरची कारवाई पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे, पोलीस कर्मचारी महेश बनकर, अभिजीत कळसकर, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, जगदीश चौधरी, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, प्रेमा सोनवणे आणि सचिन खुळे यांनी केली.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा