Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

'शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट' च्या गणेशोत्सव सजावटीत पर्यावरण पूरक समाज प्रबोधनाचा संदेश


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

 डॉ.संदेश शहा

 मो:-9921 419 159

सण आणि उत्सव ही भारतीय संस्कृतीची चैतन्य प्रतीक आहेत. मात्र सण आणि उत्सवातून काळानुरूप बदल करून पर्यावरण पुरक तसेच समाजप्रबोधनपर गणेशोत्सव साजरा करण्याचा अभिनव उपक्रम इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने राबविला आहे. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे.

जुन्या वर्तमानपत्रांच्या कागदापासून बनवलेली गणपतीची मूर्ती, त्यास कागदी प्लेट्स व विविध प्रकारच्या कागदांचा वापरातून साकारलेली आकर्षक सजावट, त्याचबरोबर मांडलेली 'मोबाईल व्यसनमुक्ती' ची संकल्पना यामुळे हा गणेशोत्सव सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने यंदाच्या गणेशोत्सवात ही पर्यावरण व समाज प्रबोधनाचा समन्वय असलेला उपक्रम राबवून सर्वांसमोर उत्सव कसा समाजाभिमुख पद्धतीने साजरा करायचा याचा आदर्श उभा केला आहे. 

   साजरा होणारे प्रत्येक उपक्रम पर्यावरणपूरक, सामाजिक संदेश देणारे असावेत याकडे संस्थेच्या अध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर यांचा सातत्याने कटाक्ष असतो. त्यानुसार गणेशोत्सवानिमित्त संस्थेच्या जावेद हबीब अकॅडमी विभागातील विद्यार्थ्यांनी जुन्या वर्तमानपत्रांपासून गणपतीची मूर्ती बनवली. कागदी प्लेट्स व विविध प्रकारच्या कागदांचा वापर करून आकर्षक सजावट केली. बाप्पांचे वस्त्र देखील ट्रस्टच्या फॅशन डिझाइन विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. त्यामुळे बाप्पांचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे समाजात निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने ' मोबाईल व्यसनमुक्ती' हा विषय मांडण्याचा निर्णय घेत त्यावर आधारित विविध उपक्रम सादर करण्यात येत आहेत. 

ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर, आरोग्य केंद्र प्रमुख महादेव चव्हाण, कोपीवरची शाळा उपक्रमाचे प्रमुख भारत बोराटे, सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार यांच्या उपस्थितीत बुधवारी गणेश स्थापना करण्यात आली. या वेळी बोलताना विश्वस्त गारटकर यांनी 'गणेशोत्सव हा समाजाला योग्य दिशा देणारा उत्सव आहे. पर्यावरणपूरक उत्सवाबरोबरच मोबाईल व्यसनमुक्तीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जाणे ही कृतीच प्रेरणादायी आहे' अशा शब्दांत विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले. यावेळी ट्रस्टचे प्रभारी दीपक जगताप, प्रकल्प अधिकारी सागर कांबळे, जावेद हबीब विभागाचे प्रमुख

अमोल राऊत, फॅशन डिझाइन विभागाचे प्रमुख त्रिशला पाटील, ब्युटी विभागाच्या रोहिणी जाधव, भारत माने उपस्थित होते.

जावेद हबीब विभागा तील विद्यार्थी श्रद्धा पवार, आदिती पवार, पूनम गवळी, सुरज जाधव, विजय दळवी, प्रीतम करगळ, विजय गोरे, आदित्य वाघमारे, जस्मीन बडकर, पवन नामदास, सपना गायकवाड, फॅशन डिझाइन विभागातील शितल राठोड, अथर्व सरोदे, समीक्षा कवितके, वैष्णवी गुणवरे, झीनत सय्यद, सिंधू जाधव, साक्षी यादव, मंदा ढावरे, आरती कुंभार, अश्विनी बाबर या विद्यार्थ्यांनी गणेश मुर्ती व सजावट करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा