अकलूज ---प्रतिनिधी
कादरभाई---शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज (ता. माळशिरस) – दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी धनशैल्य शिक्षण संस्था, अकलूज संचलित धनशैल्य विद्यालय, गिरझणी व किडझी अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष 5 वे "ओरॅकल" आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल संग्राम नगर अकलूज येथे करण्यात आले.
वर्ष २ ते १४ वयोगटातील विविध शाळांमधील तब्बल १५८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. रेवती राणे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अर्चना गवळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून श्री. किशोर शिंदे, श्री. लक्ष्मण धोत्रे, श्री. प्रताप थोरात, श्री. औदुंबर भिसे व सौ. वैष्णवी खरटमल यांचे विशेष सहकार्य लाभले.
विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला गौरवपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील सादरीकरणे पाहून पालक व उपस्थितांनी उत्साहाने दाद दिली.
डॉ. रेवती राणे यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करताना, “विद्यार्थ्यांना मोबाईल-टीव्हीच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात,” असे सांगितले. प्रमुख अतिथी डॉ. अर्चना गवळी यांनी विद्यार्थ्यांच्या टीम स्पिरिट व कलागुणांची प्रशंसा करत अशा स्पर्धा वारंवार आयोजित करण्याची गरज व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. मनीष गायकवाड यांनी “अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकता व कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळते,” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने परिश्रम घेतले. पालकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा