*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
महाविकास आघाडी तुळजापूरच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली.
या जयंतीनिमित्त तुळजापूर येथील मातंग नगर येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्याकडून अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील ऋषिकेश भैय्या मगर, जनसेवक अमोल कुतवळ, अमर नाना चोपदार , राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे तोफिक शेख, नरेश काका पेंदे, बालाजी तट ,वाहिद भाई शेख , आकाश भैया शिंदे ,प्रमोद कांबळे ,चंद्रकांत भोसले ,कुमार चौधरी ,मातंग नगरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
या जयंतीनिमित्त मातंग नगर येथून रिक्षाची रॅली काढण्यात आली ती अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची पूजा करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा