Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

*नांदणीच्या माधुरी हत्ती बद्दल प्राणपणाने लिहिलेल्या लेखाला व्हिडिओला संवादशील देशवासियाकडून दाद..*

 



*इकबाल बाबासाहेब मुल्ला* *( पत्रकार) ---सांगली* *मो :-8983587160

सांगली जिल्हा - कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण *देशभरात* "नांदणीच्या हत्तीवर" झालेल्या *अन्यायाबद्दल* "चीड" निर्माण झाली आहे . हत्तीच्या *अश्रुंबद्दल* , तिच्या "अन्यायाबद्दल" "फेसबुक" व अन्य सोशल मीडियावर सर्वप्रथम मी *वाचा* फोडली, आणि संपूर्ण महाराष्ट्र *जागा* झाला आणि अन्यायाविरुद्ध एकच वणवा पेटला. आणि देशभरातून तब्बल *12 लाख* व्युज अर्थात *बारा लाख* वाचकांनी माझा "लेख" *वाचला* व "व्हिडिओ" पाहून माझी "नोंद" घेतली. 

वाचकांनी माझ्या फेसबुक पोस्ट ला *33,000 लाईक* तसेच , *833 वाचकांनी शेयर* व *638 कमेंट* करून "माधुरी हत्तीण" परत आणण्याच्या माझ्या "छोट्याशा प्रयत्नांची" *दखल* , घेतली. यावरूनच वाचकांचे *प्राण्यांबाबत* असेलेले प्रेम - दया याचे "प्रतिबिंब" उमटले.आणि संपूर्ण देशभरातून 12 लाख लोकांचा मला मिळालेला उदंड "*प्रतिसाद*" सांगली जिल्ह्याचा एक *विक्रम* ठरला. आज संपूर्ण महाराष्ट्र माधुरी हत्ती परत घेण्यासाठी *आसुसला* आहे. जनतेच्या "प्रखर विरोधामुळे" *आमदार - खासदार* यांच्या पुढाकाराने यापुढील काळात *शांततेच्या*" मार्गाने *मोर्चे - आंदोलने* होतील आणि भविष्यात लाडकी माधुरी *1000% परत* येईल ही मला "आशा" आहे.

🔴 *वनतारा मध्ये इतर हत्तींना प्रशिक्षण क्षण देण्यासाठी "माहूत" गेले असते तर ???*

*अंबानी* च्या "हत्तीसाठी" आणि जंगलातील हत्तींसाठी त्यांना "*प्रशिक्षण*" हाच हेतू होता तर कोणत्याही *माहुताला* घेऊन त्या हत्तींना "शिकवणे" सहज शक्य होते. मग नांदणी मधील सर्वांची लाडकी असणारी माधुरी ही हत्तीचं का "हवी" होती ??? *जोतिबा* मधील "सुंदर हत्तीला" अशाच प्रकारे जबरदस्तीने घेऊन गेले होते. कालांतराने 2 वर्षानी त्या *सुंदर* हत्तीने आपला *प्राण सोडला* होता. प्रशासनाला हा "इतिहास" माहित नाही का ?? 

🔴 *माहूत "इस्माईल" महात यांचा "अन्नत्याग" - अश्रूंचा बांध फुटला!* 

आपल्या *आईपेक्षा* जास्त प्रेम करणारे इस्माईल माहूत यांचे आणि संपूर्ण *कुटुंबाचे* माधुरी हत्तीवर अतोनात "प्रेम" होते. अतिशय आत्मीयतेने ते तिचे "संगोपन" करत होते.परंतु इस्माईल माहूत यांना हत्तीच्या "विलगानंतर" *अश्रू* अनावर झाले आहेत . *मंदिरात* हत्ती असेल तर "*पूजा* होते. आज हत्ती नसेल तर पूजा कशी करायची ??? असा त्यांचा प्रश्न आहे.

माधुरी या हत्तीला *जबरदस्तीने* आणि *जनभावनेचा* "अनादर" करत, अंबानीप्रणित सरकारने नांदणी या शहरातील जनतेच्या "हृदयातील" प्राणपणाने जपलेल्या एका गोड *स्वप्नाचा* चक्काचूर करत, माधुरी या हत्तीणीच्या "मनाचा" विचार न करता "वनामध्ये" केली गेलेली रवानगी सम्पूर्ण महाराष्ट्राला "चटका" देणारी ठरत आहे.

🔴 *भाजपा सरकारला धोक्याची घंटा*

 जनतेला *गुलामगिरीची* आठवण करत *अंबानीच्या* प्रेमापायी नांदणीच्या हत्तीचे *हिसकावणे* महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही. सरकारला आणि विशेषतः *भाजपाला* याची योग्य ती *किंमत* भविष्यात मोजावी लागेल असे "चित्र" आज दिसतं आहे.

आज शांत असणारा *जैन समाज* संतापला आहे.भविष्यात हत्तीचे राजकारण "सत्तेचा पाट" बदलणारा *टर्निंग पॉइंट* ठरणार आहे हे मात्र निश्चित !

खासदार *राजू शेट्टी*, आमदार सतेज पाटील ,खासदार *ध्येर्यर्शील माने* ,सांगलीतील विद्यमान खासदार *विशाल पाटील* यांनीदेखील माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मध्ये येण्यासाठी *स्वाक्षरी* मोहीम सुरु केली आहे.राजू शेट्टी यांनी 3 ऑगस्ट ला 45 किलोमीटर चा मोर्चा काढून माधुरी पुन्हा नांदणी मध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. नांदणी मध्ये पुनःश् माधुरी येईल हा *आशावाद* व्यक्त करतो, माधुरीचा "लढा" आता "सर्वव्यापी" होईल आणि आपला *विजय* निश्चित होईल,आणि आपली माधुरी पुन्हा एकदा नांदणीच्या मठात,गावात दिसेल ही "काळ्या" दगडावरची "पांढरी" रेष असेल यात शंका नाही.




*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा