*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत लोकायत लोकसंचालित साधन केंद्र अकलूज ही संस्था 2016 पासून कार्यरत आहे. त्या संस्थेअंतर्गत महिला बचत गट 396 कार्यरत असून बचत गटात सर्व महिला 3960 समाविष्ट आहेत. लोकयत लोकसंचलित साधन केंद्र अंतर्गत व्यवस्थापक म्हणून कामिनी ताटे देशमुख यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला... तृतीयपंथीयांचा बचत गट स्थापन केला. व त्यांच्या सहकार्याने ही त्यात मोलाची साथ दिली.. समाजामध्ये तृतीयपंथी यांची ओळख समाजात मिळणारे त्यांना स्थान आणि त्यांच्या अडचणी यांचा अभ्यास करून त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम केला.. व त्यांचे बचत गट तयार करून तृतीयपंथी यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.. लोकायत लोकसंचालित साधन केंद्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा