*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मतचोरीवर उत्तर नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीचे टीका करत आहेत आता भाजपची उलटी गिनती सुरू झाले आहे दिवस मोजायला सुरुवात करा असे खडे बोल खासदार प्रणिती शिंदे ज्ञयांनी सुनावले.
विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी भाजपच्या मतचोरीचा बुरखा फाडला. त्यावर आम्ही अजून सखोल अभ्यास आणि संशोधन करणार आहोत. आत्ता भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे. दिवस मोजायला सुरुवात करावे. यामुळे भाजप बचावाच्या भूमिकेत गेला आहे आणि मतचोरीवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दाही नाही.
विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या मुलाखतीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जे वक्तव्य केले, त्यावर त्यांच्याकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्यामुळे ते राहुलजी गांधी यांच्यावर टीका करत आहेत. निवडणूक आयोग आणि सरकार हे हातात हात घालून काम करत आहेत हे सिद्ध झाले आहे.
कालच्या पत्रकार परिषदेनं जनतेवर प्रचंड परिणाम झाला असून, आत्ता भाजपच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा