*उपसंपादक -नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
आमचा मतदानाचा हक्क
आमचा अधिकार
आमची लढाई
#VoteChori विरोधात आज संसदेसमोरील मक्कर द्वार येथे खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी लोकशाहीच्या बचावासाठी एकजुटीने नवी दिल्ली संसद भवन परिसरात जोरदार निदर्शने केली.
आंदोलनादरम्यान "आमचा मतदानाचा हक्क, आमचा अधिकार, आमची लढाई", "लोकशाही वाचवा – मतदान चोरी थांबवा", अशा घोषणा देत खासदारांनी भाजप सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
मतदानाचा हक्क हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा अधिकार जर लुटला गेला, तर जनतेचा आवाजच दाबला जातो. आम्ही हा आवाज बुलंद ठेवू. मतदान चोरीविरोधात आम्ही गप्प बसणार नाही! आम्हाला पारदर्शकता आणि जबाबदारी हवी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा