Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने प्रा. डॉ." मीनाक्षी अमोल जगदाळे" यांचा सत्कार


 

अकलूज--- प्रतिनिधी

केदार लोहोकरे

टाइम्स 45 न्यूज मराठी

प्रा.डॉ.मीनाक्षी अमोल जगदाळे यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयात पीएचडी पदवी संपादन करून त्यांनी ज्ञानाचा शिखर गाठला आहे.त्यांची ही १२ वी पदवी आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सकल मराठा समाज,माळशिरस तालुक्याच्या वतीने त्यांचा दिमाखदार सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना शाल,श्रीफळ, फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. 

           आपल्या अभ्यासातून व चिकाटीमुळे मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे मराठा समाजासह संपूर्ण माळशिरस तालुक्याचा गौरव वाढल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणातून नमूद केले.या सत्काराला उत्तर देताना प्रा.डॉ.मिनाक्षी जगदाळे यांनी आपल्या यशामध्ये मार्गदर्शक, कुटुंबिय व समाजाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.त्यांच्या या शैक्षणिक कामगिरीमुळे मराठा समाजातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.यावेळी महाराष्ट्र जनसेवा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे,मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक धनाजी साखळकर,जेष्ठ पत्रकार भारत मगर,सागर वरकड,सयाजी गायकवाड,अनिल कदम,माळशिरस तालुका जिजाऊ बिग्रेडच्या तालुकाध्यक्ष सौ.शारदा चव्हाण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा