इंदापूर तालुका ---प्रतिनिधी*
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात ९० पिशव्या रक्त संकलन करण्यात आले तर यानिमित्त देशी, डेरेदार सावली देणाऱ्या ११० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबिरात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान तर वृक्षारोपणा तून पर्यावरण संतुलन करण्याचा संदेश देण्यात आला.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालय क्रीडा भवन मध्ये इंदापूर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हडपसर येथील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले तर प्रातिनिधिक स्वरूपात पिंपळाचे झाड लावून युवापिढीला प्रत्येकी एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश देण्यात आला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, रक्तदान सर्वश्रेष्ठ असून असे पुण्यकार्य नव्या पिढीने हाती घेतले आहे, हे उत्तम कार्य आहे.नव्या पिढीला स्वच्छ हवा मिळवून देणे, त्यांना पर्यावरणीय लाभ मिळवून देणे यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे.
यावेळी अनंतराव काळकुटे, अनेक मान्यवर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्रशालेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी इंदापूर महाविद्यालयाच्या गीताचे अनावरण हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अक्षय रक्तपेढीचे धीरज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा रक्त संकलन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक विलासराव वाघमोडे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे व धनंजय पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील व कैलास कदम, मेघश्याम पाटील, इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मनोज मोरे, संचालक मच्छिंद्र शेटे, अविनाश कोतमिरे, दादा पिसे, अमोलराजे इंगळे, सागर गानबोटे, पै. दत्ता पांढरे, महादेव पांढरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भोसले यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा