प्रतिनिधी - शकूर तांबोळी, अकलूज.
सदाशिवराव माने विद्यालय अकलूज मध्ये इको फ्रेंडली गणपती व बैल तयार करण्याचे कार्यशाळा दिनांक 21/8/ 2025 रोजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे विविध कलागुणांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यालयात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घेण्यात येतात. विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा, स्वनिर्मिती आनंद घेत माती पासून वेगवेगळ्या आकाराच्या गणेशमूर्ती रेखीव व सुबक मूर्ती तयार केल्या.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमोल फुले सर, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे सर, पर्यवेक्षक धोत्रे सर, सुजित कांबळे सर ,शिक्षक प्रतिनिधी शिंदे मॅडम व राऊत सर उपस्थित होते
ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता चित्रकला विभागातर्फे विभाग प्रमुख श्री दत्ता शिंदे सर सिद्धनाथ टिंगरे सर व तानाजी काशीद सर यांचे मार्गदर्शन लाभले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा