अकलूज--- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
२५ ऑगस्ट "विश्व बंधुत्व दिना" च्या निमित्ताने आज अकलूज येथील ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रात महा रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात सुमारे ७५ जणांनी रक्तदान केले तर १०० हून अधिक जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या (माऊंट आबू) माजी प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांचा स्मृतीदिन हा संस्थेच्या वतीने "विश्व बंधुत्व दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून दि.२२ ते २५ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण भारतासह नेपाळ मधील ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रावर महा रक्तदान शिबिर आयोजित केली जात आहेत.एक लाख युनिट रक्त संकलनाचे उद्दिष्ट असलेली रक्तदान शिबिराची ही मोहीम आज अकलूज सेवाकेंद्रात राबविण्यात आली. यामध्ये अकलूज परिसरातील अनेकाणेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रारंभी,प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार,वैद्यकीय अधिकारी डॉ.बीना आर्वे,डॉ.अजित गांधी,डॉ.अभिजित पाटील,डॉ.लीना कोकाटे,डॉ.अर्चना गायकवाड यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी शिवरात्री बहेनजी यांनी बोलताना म्हणाल्या की,रक्तदान शिबीर हे एक मानवता व बंधुत्वाचा उत्सव आहे.ज्यामध्ये संपूर्ण भारतातील नागरिक एकत्र येऊन रक्तदान करणार आहेत.या शिबिराचा उद्देश गरजू व्यक्तींना जीवनदान देणे.त्यांच्या जीवनात आशेचा किरण प्रज्वलित करणे आणि लोकांना बंधुत्वाच्या धाग्याने जोडणे असल्याचे सांगितले. आध्यात्मिक कार्याबरोबर संस्थेच्या वतीने राबवित येत असलेले सामाजिक उपक्रम उल्लेखनीय असल्याचे मत डॉ.एम.के.इनामदार यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजयोगीनी बी.के. गोदावरी दिदी (कुर्डूवाडी)यांनी केले.रक्तदान यशस्वी होण्यासाठी सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेचे पीआरओ तुषार साबळे व टीम यांनी सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा