Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

*तुळजापूर तालुक्यातील बेकायदेशीर वीट भट्ट्यांच्या विरोधातील आंदोलन संबंधित अधिकाऱ्याच्या लेखी आश्वासनानंतर मागे...*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तालुक्यातील बेकायदेशीर विटेच्या भट्ट्यांविरोधात मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या बाबत या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महामंडळ लातूर येथे दिनांक 14 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. सदरचे आंदोलन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापुरकर यांच्या आदेशावरून व जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .

          यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना, तसेच तहासिलदार महाराष्ट्र प्रदर्शन महामंडळ लातूर यांना वारंवार निवेदने, तसेच धरणे, रस्ता रोको अशा विविध मार्गांनी आंदोलन करण्यात आले होते.


संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील काही विटेचे भट्टी चालक परवानगीशिवाय व पर्यावरण नियमांचे उल्लंघन करत भट्ट्या चालवत आहेत. यामुळे पर्यावरणास गंभीर धोका निर्माण झाला असून प्रशासनाकडून यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

     आजच्या अंतिम टप्प्यातील आंदोलनात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी शासन व प्रशासनाला तातडीने बेकायदेशीर भट्ट्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.



या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा