*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहोकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनानुसार दि.१२ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये "हर घर तिरंगा"म्हणजे घरोघरी तिरंगा, या अभियानाच्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.ही रॅली महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा पासून,संत सावता माळी मंदिर माळेवाडी,बी.फार्मसी कॉलेज प्रवेशद्वार,खाशाबा जाधव इनडोअर स्टेडीयम,महाविद्यालय परिसर या मार्गाने काढण्यात आली. महाविद्यालय परिसरात आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.दत्तात्रय मगर यांनी तिरंगा प्रतिज्ञेचे वाचन केले. त्यानंतर तिरंगा जनजागृती रॅलीचा समारोप करण्यात आला.या रॅलीमध्ये महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील व महाविद्यालयातील सर्व विभागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.ही रॅली यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय मगर,डॉ.सज्जन पवार, प्रा.स्मिता पाटील,राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा.नंदकुमार गायकवाड शारीरिक शिक्षण संचालक प्रा.के. के.कोरे,प्रा.दादासाहेब कोकाटे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा