*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
*केक कापून वाढदिवस साजरा, नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार*
सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ. उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचे उद्घाटन सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यात ७५ रुग्णांच्या नेत्राची तपासणी डॉ शिवाजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
तसेच यावेळी मा. उज्वलाताई शिंदे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर नूतन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीत निवड झाल्याबद्दल जनरल सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी अलकाताई राठोड, जनरल सेक्रेटरी विनोद भोसले, सेक्रेटरी श्रीशैल रणधिरे, सेक्रेटरी सुरेश हावळे, तसेच शहर कार्याध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेश सचिव अलकाताई राठोड विनोद भोसले, श्रीशैल रणधीरे, सुरेश हा, कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळू, व सुशील बंदपट्टे, माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, शिक्षक सेल अध्यक्ष सुबोध सुतकर, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, अनिल मस्के, राधाकृष्ण पाटील, अँड, करीमुनिसा बागवान, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, शोभा बोबे कोंडणताई काकडे, परशुराम सतारेवाले, गिरिधर थोरात, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, भीमराव शिंदे, सागर उबाळे, सचिन गुंड, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, शाहू सलगर, सुनील सारंगी, शिवाजी सांळुखे, व्यंकटेश बोमेन, शोभा बोबे, विणाताई देवकते, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, ज्योती गायकवाड, अंजली मंगोडेकर, नीता बनसोडे, निशा मरोड, मुमताज शेख, सुनिता शेरखाने, चंद्रकला निजमल्लू, मोहसिन फुलारी, नागनाथ शावणे, सोमनाथ व्हटकर, देवेंद्र सैनसाकाळे, साई शिंदे, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा