Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

*दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगरच्या मिल रोलर चे पूजन*

 


*उपसंपादक -नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

माळीनगर येथील दि.सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या सन २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी सज्ज होत असलेल्या कारखान्यातील मिल रोलरचे पूजन कारखान्याचे होलटाईम डायरेक्टर गणेश इनामके यांच्या हस्ते करण्यात आले.हा कारखान्याचा ९१ वा गळीत हंगाम आहे.

          याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी बोलताना सांगितले की,उसाचे क्षेत्र व मिळणारे उत्पादन याचा विचार करता यंदा कारखाना चार ते साडेचार महिने चालेल.कारखाना ५ लाखापर्यंत गळीत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यंदा उन्हाळ्यात धरणातील पाण्याची परिस्थिती चांगली होती.तसेच मे मध्ये राज्यात मान्सूनपूर्व पडलेल्या पावसामुळे उसाचे टनेज आणि रिकव्हरीमध्ये वाढ होईल.गत वर्षापेक्षा उसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस तोडणी यंत्रणेला ॲडव्हान्स देऊन करार केलेले आहेत.यावर्षी ऊस तोडणी मशीनचा जास्तीत जास्त वापर करून ऊस तोडणी केली जाणार आहे.असे राजेंद्र गिरमे सांगितले. 


             या कार्यक्रमास दुसरे होलटाईम डायरेक्टर परेश राऊत, व्हा.चेअरमन निखिल कुदळे,माजी मॅनेजिंग डायरेक्टर व विद्यमान संचालक सतीश गिरमे,मोहन लांडे, निळकंठ भोंगळे,विशाल जाधव, राजेंद्र देवकर,शुगरकेन सोसायटीचे व्हा.चेअरमन कपिल भोंगळे, एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे,संचालक पृथ्वीराज भोंगळे,आदी मान्यवरांसह कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर,चीफ इंजिनिअर सुरेश जगताप,इले.इंजिनीअर अनिल जाधव,मनीष पांढरे,शब्बीर शेख,महेश शिंदे,विराज कुदळे, सचिन कुदळे,पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा