Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

*लोकशाहीर "अण्णाभाऊ साठे" यांची जयंती- जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्य, लहुजी शक्ती सेना, लहुजी साम्राज्य, यांच्या वतीने विविध उपक्रमाने साजरी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ वी जयंती महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना,माळशिरस तालुका लहुजी शक्ती सेना,लहुजी साम्राज्य अकलुज यांच्यावतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली या जयंतीचे औचित्य साधून मुलींच्या नावे बॅक ठेव पत्र,विद्यार्थ्यांंना वह्या. वाटप,नगरपरिषदेतील महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप तर तालुक्यातील समाज बांधवांना जयंती साजरी करता यावी म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचे वाटप करण्यात आले विविध अशा समाजपयोगी विधायक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

अकलूज येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जनसेवा संघटने चे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी १०० मुलींच्या नावाने प्रत्येकी ५ हजार रु.बॅक ठेवपत्राचे वाटप शालेय,विद्यार्थ्यांंना ५ हजार वह्या वाटप,अकलुज नगर परिषदेच्या सफाई महिला कर्मचारी यांना साडी वाटप, तसेच तालुक्यातील समाज बांधवांना जयंती साजरी करता यावी आणि दररोज त्यांना अभिवादन करता यावे या उद्देशाने तालुक्यातील विविध भागात अण्णाभाऊ साठे यांच्या २१ पुतळ्यांचे वितरण ह्रदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.    



         अत्यंत लहान वयात उत्कृष्ट असे अनेक सुबक शिल्प साकारणारे युवा पिढीचे आदर्श-' सुरज युवराज जगताप 'यांना" युवाशिल्प रत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले
       

           याप्रंसंगी माजी जि.प.सदस्य शरद मोरे जनसेवेचे आण्णासाहेब इनामदार,आण्णासाहेब शिंदे,

सतिश पालकर,रणजितसिंह देशमुख,नवनाथ साठे, सुधीर रास्ते,मयुर माने,बबनराव शेंडगे,विठ्ठल इंगळे, जनसेवा संघटना, माळशिरस तालुका लहुजी शक्ती सेना ,लहुजी साम्राज्य अकलूज या संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा