Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

इंदापूर येथील दर्गाह मस्जिद शॉपिंग सेंटर मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

 डॉ.संदेश शहा

 मो:-9921 419 159

इंदापूर दर्गाह मस्जिद शॉपिंग सेंटरच्या हॉल मध्ये टिपू सुलतान यंग सर्कल संचलित फातिमा शेख अभ्यासिका यांच्या वतीने यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्ती पत्रक व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी इंदापूर शहरातील पाच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला.



गौरविण्यात आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. 

१) हाजी युसूफ शेख यांचे नातू मोहम्मद उमर समीर शेख यांची प्रतिष्ठित नासा अंतराळ संस्था (अमेरिका) येथे जाण्यासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

२) डॉ. इरम अमजद मोमीन यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव (उस्मानाबाद) येथे एमबीबीएस साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला.

३) अल्मास जाकीर मोमीन यांनी “कॉस्मेटिक लिक्विड अप्लिकेटर विथ मल्टी-इंटेन्सिटी व्हायब्रेशन मेकॅनिझम” या अभिनव डिझाईनवर मोठे यश संपादन करून दोन मानाचे सन्मान प्राप्त केल्याबद्दल गौरव झाला.

४) अर्शीया सादिक शेख यांची एमआयटी एमईई आरएस कॉलेज, लातूर येथे बीपीटीएच मेडिकल फिजिओथेरपी साठी निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.

५) जुनेद कासम बागवान यांची बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या तथा श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका

फौजिया शेख मॅडम म्हणाल्या, आजचे गुणवंत विद्यार्थी हे देशाचे उद्याचे जबाबदार नागरिक होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या यशाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. सामाजिक कार्यकर्ता सायराभाभी आतार म्हणाल्या, उपरोक्त गुणवंत विद्यार्थ्यांनी देशसेवा, पर्यावरण संतुलन केंद्रबिंदू मानून यशस्वी वाटचाल करावी.

सामाजिक कार्यकर्त्या फौजिया पठाण मॅडम म्हणाल्या, गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत ठसा उमटवून शहर नावलौकिकात भर घालावी.

यावेळी विशेष म्हणजे अनिस डिफेन्स करिअर अकॅडमी, विश्रांतवाडी चे अनिस कुट्टी सर यांनी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचे आश्वासन देवून सर्वांना फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.

यावेळी शकीलभाई सय्यद, गफूरभाई सय्यद, सादिकभाई शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर केले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या रेश्मा शेख, डॉ. परविन पठाण मॅडम, सुलताना मोमीन मॅडम, माधवी सोननीस मॅडम, हाजी शरफुद्दीन मोमीन, हाजी इनायत उल्लाह शेख, हाजी युसुफ शेख, हाजी सादतभाई काझी, हाजी अस्लमभाई बागवान, हाजी सलीम बागवान, शाबीरभाई बेपारी, अमजदभाई मोमीन, हमीदभाई आतार, दिलावर काझी, आरशद भाई सय्यद, लतीबभाई मोमीन, अलीभाई मोमीन, अल्ताफ भाई पठाण, शरफुद्दीनभाई शेख, समीरभाई शेख, जाविदभाई शेख, झहीरभाई मोमीन, नासिरभाई मोमीन, खलीलभाई मोमीन लोहाजभाई मणियार, इम्रानभाई बेपारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. फातिमा शेख अभ्यासिकेतील विद्यार्थी तबरेज मोमीन, शान शेख, रिजवान मोमीन, सैफ काझी, अयाज बेपारी, अरबाज बेपारी, सोहेल कुरेशी, तौहीद मोमीन, फारुक शेख, जुनेद सय्यद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्या साठी मेहनत घेतली. प्रास्ताविक

जरीना शेख मॅडम यांनी तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन टिपू सुलतान यंग सर्कल, इंदापूर शहर संस्थापक अध्यक्ष फिरोजखान पठाण यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा