इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
दिनांक २२ ऑगस्ट २०२५ ते २४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विद्या प्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL.) तर्फे बँक परीक्षा आयोजित करण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या ५००–५५० परीक्षार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, महाविद्यालय प्रशासनाच्या नियोजनबद्ध तयारीमुळे परीक्षा अत्यंत सुरळीत, शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या तीन दिवस चाललेल्या परीक्षेसाठी महाविद्यालयात संगणक प्रयोगशाळा, उच्च क्षमतेची इंटरनेट सुविधा, वीज पुरवठा व तांत्रिक सहाय्य यांची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये यासाठी महाविद्यालयातील तांत्रिक कर्मचारी व सहाय्यक कर्मचारी पूर्णवेळ परीक्षागृहात तैनात होते. परीक्षार्थ्यांच्या नोंदणीपासून ते परीक्षेची यशस्वी पूर्तता होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थितपणे राबविण्यात आली.परीक्षेच्या काळात प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे, परीक्षा प्रभारी अधिकारी प्रा. संतोष देवकाते, तसेच शिक्षकवर्ग सतत उपस्थित राहून परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी लक्ष ठेवून होते. परीक्षागृहात परीक्षार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता, सुरक्षा व शिस्त यांवरही विशेष लक्ष देण्यात आले.राज्यातील विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण जाणवू नये म्हणून महाविद्यालयाच्या वतीने आवश्यक त्या सर्व सूचना व मार्गदर्शन वेळोवेळी देण्यात आले. परीक्षेच्या काळात शांतता, शिस्त आणि सौहार्दपूर्ण वातावरण राखले गेले.
परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर MKCL तर्फे महाविद्यालय प्रशासनाचे विशेष आभार मानण्यात आले. महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध कार्यप्रणालीचे कौतुक करण्यात आले. तसेच, भविष्यातील इतर शैक्षणिक व व्यावसायिक परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालय योग्य केंद्र ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.या बँक परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे, शिक्षकवर्ग, परीक्षा प्रभारी अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, तसेच सर्व कर्मचारीवर्ग यांचे विशेष प्रयत्न लाभले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे परीक्षेचे कामकाज कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण झाले. MKCLच्या वतीने तसेच परीक्षार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयाचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले असून, अशा प्रकारच्या शिस्तबद्ध व यशस्वी आयोजनामुळे विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूरचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अधिक उज्ज्वल झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा