Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

कारगिल शहीद वजीर रास्ते यांच्या २६ व्या शहीद दिना निमित्त (पुण्यस्मरण) रक्तदान, वृक्षारोपण व किर्तन संपन्न


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

----- ओझरे (ता.इंदापूर) येथील कारगिल शहीद वजीर रास्ते यांच्या २६ व्या शहीद दिना निमित्त (पुण्यस्मरण) माजी सैनिक, वारकरी सांप्रदाय व नागरिकांच्या उपस्थितीत रक्तदान, वृक्षारोपण व किर्तन आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शहीद वजीर रास्ते यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना व श्रद्धांजली वाहण्यात आली.

     ओझरे येथील कारगिल शहीद वजीर दत्तात्रय रास्ते यांच्या २६ व्या शहीद दिना निमित्त (पुण्यस्मरण) विविध उपक्रम राबवून संपन्न झाला. यावेळी अकलूज कारखान्याच्या संचालिका स्वरूपराणी मोहिते पाटील, वीरपिता दत्तात्रय रास्ते, वीरमाता बायडाबाई रास्ते, भरत रूपनवर, वर्धमान बोडके, दिलीप रास्ते आदि मान्यवर उपस्थित होते.



    कारगिल शहीद वजीर रास्ते यांच्या स्मारकाला मानवंदना देताना वीरपिता व वीरमाता यांना अश्रू अनावर आले. वीरपिता दत्तात्रय रास्ते बोलताना म्हणाले की, देशाचे संरक्षण करताना कारगिल येथे माझ्या मुलाने बलिदान दिले. देशाची सेवा करताना आलेले विर मरण हे आमच्या कुटुंबियांचे अहो भाग्य आहे. ऐन तारुण्यात वयाच्या २१ व्या वर्षी देशासाठी आहुती देणारा मुलाचे बलिदान देश व कुटुंबिय कधी विसरू शकणार नाहीत.



    कार्यक्रमाचे औचित्य साधत ओझरे गावात व स्मारक परीसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सोलापूर येथील सिध्देश्वर ब्लड बॅकेच्यावतीने रक्तदान शिबिरही घेण्यात आले. त्यामध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला. त्यांना ट्रॅव्हल बॅग किंवा सोलापूर चादर भेट देण्यात आली.

    कार्यक्रमास पुणे, सोलापूर व सांगली जिल्ह्यातील माजी सैनिक, पदाधिकारी, पोलीस पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांनी उपस्थित राहत आदरांजली वाहिली.



चौकट - कारगिल शहीद वजीर दत्तात्रय रास्ते यांच्या बलिदानाला २६ वर्षे उलटून गेली. परंतू त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने देण्यात येणारी जमिन अद्यापी देण्यात आलेली नाही. शासनाच्या दफ्तर दिरंगाईचा फटका शहिद कुटूंबियांना २६ वर्षांपासून झेलावा लागत असल्याची खंत कुटूंबियांनी व्यक्त केली.

फोटो - ओझरे (ता.इंदापूर) येथील शहिद वजीर रास्ते यांना मानवंदना देताना.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा