विशेष प्रतिनिधी --एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
विद्यासागर कोचिंग क्लासेस आयोजित राज्यस्तरीय अभिनव प्रज्ञाशोध परीक्षा 2024 /2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय इयत्ता सहावी शिकत असलेला आरेज वाजिद सय्यद यांने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्याने दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल येथे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विद्यासागर कोचिंग क्लासेस यांच्या वतीने राज्यस्तरीय अभिनव प्रज्ञाशोध परीक्षा 2024 /25 घेण्यात आली होती त्यामध्ये जिल्हा आणि केंद्रस्तर विद्यार्थी पारितोषिक वितरण व सन्मान सोहळा" कृष्णप्रिय हॉल" येथे आयोजित करण्यात आला याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला
याप्रसंगी डॉ.मनोहर इनामदार ,पोलीस उपविभागीय अधिकारी -नारायण शिरगावकर, सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक- अमोल फुले, उपमुख्याध्यापक -दत्तात्रय घंटे, सदाशिवरामाने विद्यालय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका -नूरजहान शेख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक- विलास शिंदे, प्रज्ञाशोध परीक्षा पुणे चे अध्यक्ष- लखन कांबळे ,बिजवडीचे ग्रामपंचायत सदस्य- बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते
शेवटी विद्यासागर कोचिंग क्लासेस माळेवाडी चे अध्यक्ष प्रशांत भोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले
*या राज्यस्तरी प्रज्ञाशोध परीक्षेत अरेंज वाजिद सय्यद प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने "टाइम्स 45 न्यूज़ मराठी" परिवारा च्या वतीने हार्दिक अभिनंदन*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा