इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
लोकनेते प्रदीपदादा गारटकर मित्र परिवार आयोजित दहीहंडी स्पर्धेत स्वराज्य दहीहंडी संघाने बाजी जिंकत विजेतेपद पटकावले. या संघाला २५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे हस्ते स्मृतिचिन्ह आणि पारितोषिक बहाल करण्यात आले.
इंदापूर प्रशासकीय भवन समोरच्या शंभर फुटी रस्त्यावर शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी हजारो आबाल वृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला दही हंडी स्पर्धेचा थरार सुमारे चार तास रंगला. श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या शुभहस्ते झाल्यानंतर स्पर्धेस सुरुवात झाली. इंदापूर शहरातील तिरंगा दहीहंडी संघ, इंद्रेश्वर दहीहंडी संघ, वीरश्री मालोजीराजे दहीहंडी संघ, व्यंकटेश दहीहंडी संघ,महात्मा फुले दहीहंडी संघ व शिरसोडी ( ता. इंदापूर ) येथील स्वराज्य दहीहंडी संघांनी स्पर्धेत भाग घेतला. सिनेअभिनेत्री सुरेखा कुडची, सोनाली कुलकर्णी, नृत्यांगना नमिता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कलागुण व नृत्याविष्काराचे उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
व्यंकटेश दहीहंडी संघाने सात थरांची सलामी देत सर्वांचे लक्ष वेधले. या संघाच्या सर्वात वरच्या थरावर असलेली मुलगी ही या उत्सवाचे आकर्षण ठरले. नंतर स्वराज्य दहीहंडी संघाने सात थरांची उभारणी करत दहीहंडीला बांधलेली फुले हातात घेतल्याने त्यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, अमर गाडे, अनिल राऊत, श्रीधर बाब्रस, अनिकेत वाघ, अतुल शेटे पाटील, अक्षय तथा आशू गानबोटे, श्रीनिवास घोलप, अविनाश मखरे, सुधाकर ढगे, ताशू शेख, अमर लेंडवे, महेश जठार, रोहित ठोंबरे, इम्रान शेख, शुभम मखरे, रमेश शिंदे, भरत देशमाने यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
आरजे अक्षय व संतोष नरुटे यांच्या रंगतदार समालोचनाने कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, श्रीमंत ढोले सर, सचिन सपकळ, डॉ. शशिकांत तरंगे, मिलिंद दोशी, हरिदास सामसे, शिवाजी तरंगे, सुधीर मखरे, लक्ष्मण देवकाते, महादेव शिंदे, वासिम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा