*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
*तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागील नार्थकोट मैदान येथील एक एकर जागा उद्यानाकरिता एप्रिल २०२१ मंजूर झाली होती आज रोजी काही अटी शिथिल करून*
*त्याच जागेवर संविधान भवन निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागील नार्थकोट मैदान येथील एक एकर जागा उद्यानाकरिता मिळावी म्हणुन सोलापुर महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता हा प्रस्ताव तात्काळ मंजूर होणेकरिता आमदार प्रणिती शिंदे यांनी शासन दरबारी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असुन नार्थकोट मैदान ची एक एकर जागा शासनामार्फ़त सोलापूर महानगरपालिकेला उद्यानाकरिता मंजूर होऊन ही जागा एप्रिल २०२१ साली ताब्यात देण्यात आली होती पण त्या जागेवर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये अशी अट घातली होती. ही अट रद्द व्हावे म्हणून तत्कालीन आमदार आत्ताचे खासदार प्रणिती शिंदे यांचा महानगरपालिका प्रशासन मार्फत शासन दरबारी सतत प्रयत्न चालू होता. त्यांच्या सततच्या प्रयत्नाला यश आले असून आज रोजी ती अट रद्द करण्यात आली असून संविधान भवन चा मार्ग मोकळा झाला आहे.
लवकरच भव्य अशी संविधान भवन निर्माण होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा