*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अकलूज शहरात प्रथमच सहायता वेलफेअर फाऊंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शप या सामाजिक व राजकीय अशा संयुक्त जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस विधानसभेचे धडाकेबाज आ. उत्तमराव जानकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आ.जानकारांनी सांगितले की, या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल.
या सोहळ्यास माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी धावती भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक मान्यवर लग्नसराई मुळे पोहचू शकले नाहीत. यावेळी रफीअहमद कोरबू, खुदबुद्दीन काझी,सलीम शेख, मौला शेख,भैय्या माढेकर, मुख्तार कोरबू, नाजीरहुसैन बागवान, तय्यब मुलाणी, अमीरहमझा खतीब ,हमीद मुलाणी,हुसेन शेख,मुस्लिम समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष रशीद शेख, टाईम्स ९ चे संपादक पत्रकार नौशाद मुलाणी,टाईम्स ४५ चे संपादक हुसेन मुलाणी,रशीद मुलाणी, हमीद डांगे, कमाल शेख, मुजीब सय्यद ,पत्रकार फिरोज शेख, प्रेस फोटोग्रापर कादर मुलाणी, शकूर तांबोळी , रचनाकार वृत्त लेखक किरण धुमाळ,जावेद तांबोळी आदी सामाजिक, राजकीय तसेच व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्तारभाई कोरबू यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोहसीन शेख यांनी मानले.
या कार्यक्रमामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार असून, हा उपक्रम लोकसेवेला नवा आयाम देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून परिसराबरोबर वॉर्डातील समस्या जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील,असे मोहसीन शेख यांनी आश्वासन दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायता वेलफेअर फाऊंडेशन इन्नूस सय्यद,समीर काझी,फारुख शेख, वसिम काझी, मोहिद्दीन शेख, शोएब बागवान,फरीद काझी, जानीसार मुलाणी,वसिम पटेल, मुस्ताक तांबोळी, इम्रान बागवान,अलीम कुरैशी, तनवीर सय्यद,जाकीर कोरबू ,अयान तांबोळी, समशेर शेख,अमन शेख आदींनी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा