इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
पुणे चांदणी चौक येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर मध्ये दिगंबर जैन समाजाचे भाद्रपद दशलक्षण महापर्व समारोप प्रसंगी भगवान महावीर यांच्या जयघोषात चांदीच्या पालखीतून तीर्थंकर महावीर भगवान मूर्तीची हजारोंच्या उपस्थितीत सवाद्य पालखी व परिक्रमा मिरवणूक संपन्न झाली.
गुरूवार दि. २८ ऑगस्ट रोजी दशलक्षण महापर्व सुरू होऊन रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी क्षमावाणी च्या कार्यक्रमाने दशलक्षण धर्मपर्वाची समाप्ती पालखी मिरवणुकीने सोहळ्याने झाली.
या दशलक्षण धर्म पर्वात दिगंबर जैन मंदिर मध्ये भव्य मंडप उभारण्यात आला होता तसेच मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या दशलक्षण पर्वात सलग दहा दिवस जैन मंदिर मध्ये सकाळी महाभिषेक, महाशांती धारा, दशलक्षण पर्व पूजन, पूजा अर्चना, सायंकाळी मंगल आरती व त्यानंतर सांगानेर ( राजस्थान ) येथील अतिशय शास्त्री जैन यांचे दशधर्मा वर प्रवचन आदी कार्यक्रम संपन्न झाले. दशलक्षण धर्म पर्वात उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन आणि उत्तम ब्रह्मचर्य या दशलक्षणांची पूजा करण्यात आली. दिगंबर जैन समाजात या दशलक्षण धर्म पर्वला अत्यंत महत्त्व असून या काळात उपवास, स्वाध्याय, तप, त्याग आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जैन पाठशाळेतील मुलांचे विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा गौरव करण्यात आला.
रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी क्षमावानी निमित्त दशलक्षण विसर्जन समाप्ती भव्य पालखी मिरवणूक संपन्न झाली. यावेळी चांदीच्या पालखी मध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. यावेळी १० दिवस निरंकार उपवास केलेले सौ. ज्योती अभिजित शहा व सौ. वासंती महावीर देशमाने यांची जैन धर्म प्रभावनेसाठी बग्गी रथातून चांदणी चौक ते बावधन मेन रोड वर मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळा व मिरवणुकीसाठी गोमटेश झांज पथक, वसगडे, ( ता.पलूस, जिल्हा सांगली ) हे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या झांज वादनाच्या तालात जैन युवक युवतींनी गरबा चे नृत्य करीत आनंद लुटला.
पालखी परिक्रमा करून जैन मंदिरात आल्या नंतर भगवान महावीर महाशांतिधारेचा मान विशाल दगडे, भगवान चंद्रप्रभू महाशांती धारेचा मान सुरज मगदूम तर मुनीसुव्रत भगवान महाशांती धारेचा मान गायत्री मालगावे यांना मिळाला. त्यानंतर दहा दिवस निरंकार उपवास केलेल्या व्रतींचा पारणेचा कार्यक्रम मंदिरच्या स्वाध्याय हॉल मध्ये संपन्न झाला. त्यानंतर विविध धार्मिक कार्यात योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भगवान महावीर मंडळ व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त उदय लेंगडे, ज्योती बुरसे, शिरीष बोरगावे, तात्यासाहेब खोत, अशोक मगदूम, श्रीकांत पाटील, रमेशभाई शहा, अजित शेट्टी, सुनील बिरनाळे, मोहन कुडचे, प्रीतम मेहता, अमित गांधी, शोभा पोकळे, प्रकाश कुडचे, विशाल दगडे, डॉ. अभिजित शहा, प्रशांत पाटील, केतन खापरे, प्रीती पाटील, प्रशांत गोधा, चेतन जैन आदी विश्वस्त मान्यवर उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा