Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली.


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टी ग्रस्त व पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता धाराशिव जिल्ह्यात आले असता धाराशिव चे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांच्या समवेत धाराशिव लोकसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले


माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली असून नद्या, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे पुर परिस्थीती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबिन, मुग, उडीद, मका, फळबागा व ऊस इत्यादी सर्व पिके उध्वस्त झाली आहेत. बार्शी जि. सोलापूर, औसा व निलंगा जि. लातूर व धाराशिव जिल्हयातील सर्वमंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद देखील झाली आहे. त्यामुळे मा. साहेब आपण "माय बाप सरकार" चे प्रमुख म्हणुन आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्याकडे खालील प्रमुख मागण्या करत आहोत. तरी त्या मान्य करणेबाबत आपल्या स्तरावरुन सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा अशी ही विनंती. करण्यात आली



प्रमुख मागण्या खालील प्रमाणे


१) ओला दुष्काळ जाहीर करावा


२) शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफी देण्यात यावी.


३) प्रधानमंत्री पिक विमा योजना या हंगामापासून उंबरठा


उत्पन्नाच्या आधारे शेतकऱ्यांना पिक विमा देण्याची अट ठेवली आहे व यापुर्वी याच योजनेत 1. पेरणी न होण्याची परीस्थिती


(Prevented Sowing) 2. प्रतीकुल हवामान (Mid season Adversity), 3. स्थानिक अपदा (Local Calamity) 4. पिक कापणी पश्चात आपदा (Post Harvest Calamity) या तरतुदी यावर्षीपासून बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमाच मिळणार नाही त्यामुळे सदरचे बदलेले निकष रद्द करुन या अटी या योजनेसाठी कायम ठेवाव्यात.


४) मिरज व कोल्हापुर येथे अतिवृष्टी झाल्यानंतर जशा स्वरुपाची मदत महाराष्ट्र


सरकार मार्फत करण्यात आली होती तशीच मदत यावेळी आमच्या भागात करावी.

५) अतिवृष्टी व पुरामुळे रस्ते पूल बंधारे तलाव व वीज वितरण कंपनीचे रोहित्र विजेचे खांब वाहून गेलेले आहे तरी याची दुरुस्ती करणेबाबत विशेष दुरुस्ती कार्यक्रम राबवून दुरुस्ती करावी 

६) ज्या शेतकऱ्यांची जमीन खरबडून गेली आहे यामध्ये बहुभूधारक शेतकऱ्यांचा देखील समावेश करावा 

७) ज्या शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे पशुधन पुरामध्ये वाहून गेले आहे अशा शेतकऱ्यांना त्या पशुधनाची भरपाई म्हणून बाजार मूल्याप्रमाणे रक्कम द्यावी 

८) अतिवृष्टीमुळे ज्या नागरिकांच्या घराची व शेतकऱ्यांची व मजुरांची जनावरांचे गोठ्याची पडझड झाली आहे त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी

९) पंजाब सरकारने अतिवृष्टीमुळे हेक्टरी तीस हजार रुपये जाहीर केली आहे अशीच मदत महाराष्ट्र सरकारने आमच्या भागातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी 

    *तरी आपण निवेदनाचे दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही कराल असेही नियोजनात म्हंटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा