Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

शेतकरी व व्यापारी वर्ग यांच्या सेवेसाठी शिवरत्न हॉटेल सदैव कटिबद्ध


 

अकलूज--- प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज शंकरराव मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नव्याने सुरु करण्यात आलेल्या हाॅटेल शिवरत्नला आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील,सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार, सचिव राजेंद्र काकडे यांनी सदिच्छा भेट देवून होतकरू तरूणांनी सुरू केलेल्या हाॅटेल व्यवसायाचे कौतुक केले.



         कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव पहाटे चार वाजता सुरू होतो.शेतकरी वर्ग व लिलावा तील माल घेण्यासाठी व्यापारी वर्ग येत असतो.तेव्हापासून संपुर्ण दिवसभर सर्वांची सेवेसाठी तरूण व्यवसायिक हाॅटेल व्यवसायाच्या माध्यमातून सर्वांची तत्पर सेवा करीत असतात. राजूभाई बागवान यांनी छोटासा हॉटेल शिवरत्न एम एम सुरू केले आहे.ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेबद्दल शेतकरी व व्यापारी समाधान व्यक्त करीत आहेत.या हॉटेल व्यवसायात नव्याने प्रवेश केले आहे.या व्यवसायकाने अल्पावधीतच लोकांची मने जिंकून चविष्ट पदार्थाचा आस्वाद ग्राहकांना दिला आहे.त्यामुळे मार्केट कमिटी परिसरात खवय्यांची वर्दळ वाढली आहे.यामागे राजूभाई व त्यांचे भाऊ इम्रानभाई आणि त्यांचे कुटुंबीय अथक परिश्रम घेत आहेत.त्यांच्या या सेवेसाठी व्यापारी,आडतदार, शेतकरी अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल व सेवेबद्दल कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा