Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

महाराष्ट्रात परतीच्या पाऊस आणि अतिवृष्टीच्या पूर परिस्थितीमुळे २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलावी--अतुल खूपसे पाटील यांची मागणी


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

महाराष्ट्रातील परतीच्या पर्जन्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा - २०२५ पुढे ढकलावी अशी मागणी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की

          महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ ही २८ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित आहे. परंतु मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

   संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजूर वर्ग संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून शेतीमधील पिके तर वाहून गेली त्याबरोबर पिकासाठी लागणारे सुपीक माती या शेतीमधून वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यावर अवलंबून शेतमजूर असतात व्यापारी असतात त्यांची ही मुले या स्पर्धा परीक्षेत उतरत असतात त्यांच्यावर हे संकट आल्याने त्यांची मनस्थिती कशी असेल किंवा या परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविताना काय परिस्थिती होत असेल याचा विचार करणे गरजेचे आहे

      तसेच २६ ते २८ सप्टेंबरला हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. 

      साधारणपणे जास्तीत जास्त १ ते २ आठवडे परीक्षा पुढे ढकलून पूरस्थिती पूर्वपदावर येताच परीक्षा घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. 

      आपण विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन त्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा ,ही नम्र विनंती. 



 कठळावे आपला 


 अतुल खूपसे पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा