संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
सोलापूर - रोटरी क्लब ऑफ सोलापूर द्वारा, विद्याभारती प्रकाशन, लातूर यांच्या देणगीतून, सोलापूर महानगरपालिकेच्या २३ शाळांमधील २५०० विद्यार्थ्यांना इंग्रजी ते मराठी डिक्शनरीचे मोफत वाटप उपक्रमाचा शुभारंभ बुधवार दि. २४. सप्टेंबर रोजी संपन्न झाला. ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी मा. श्री विठ्ठल ढेपे तर शिक्षण विभाग पर्यवेक्षक श्री भगवान मुंढे व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे नियुक्त प्रांतपाल रोटे. जयेश पटेल ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपक्रमाच्या शुभारंभाचा कार्यक्रम लष्कर येथील कॅम्प शाळेत घेण्यात आला. त्याच परिसरातील तीन शाळांमधील 600 हून जास्त विद्यार्थ्यांना डिक्शनरी वाटप करण्यात आले. शहरातील बाकीच्या 20 शाळा आता क्रमवार घेण्यात येणार असल्याचे अध्यक्षा रोटे. धनश्री केळकर यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे श्री. ढेपे यांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करून पहिलीपासून इंग्रजी विषय असल्याने या शब्दकोशांचा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल असे प्रतिपादन केले. नियुक्त प्रांतपाल रोटे. जयेश पटेल यांनी रोटरीचे आंतरराष्ट्रीय कार्य आणि पोलिओ निर्मूलनाच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमास सचिव निलेश पोफलिया, संदीप जव्हेरी, क्लबचे लिटरसी प्रमुख शिवाजी उपरे, सुनील माहेश्वरी, डॉ. ज्योती चिडगुपकर, कालिदास जाजू, संतोष कणेकर, आनंद गुंड्याल, मितेश पंचमीया, शिक्षक संघटनेचे दत्तात्रय चौगुले, मुख्याध्यापक सरगम, नदाफ मॅडम व सर्व गुरुजन वर्ग उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा